शरद पवारांनी फोन फिरवला, बंडखोरांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना.

परंडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. ठाकरे गटाचे रणजीत पाटील आणि शरद पवार गटाकडून राहुल मोटे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर आज रणजीत पाटील हे उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र मी माघार घेतलेली नाहीय असं रणजीत पाटील यांनी म्हटले आहे. परंडा विधानसभा मतदारसंघातून मी माघार घेतलेली नाही अफवांवर विश्वास ठेवू नका,असं रणजीत पाटील यांनी सांगितले. विरोधकांकडून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहे. पक्षाकडून अध्याप कोणतही बोलणं झालेलं नाही. परंडा विधानसभेसाठी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझा उमेदवारी अर्ज कायम आहे. उमेदवारी मागे घेण्याची चर्चा शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार रणजीत पाटील यांनी फेटाळली आहे.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment