शरद पवारांचा विखेंना खोचक टोला , म्हणाले कुठे आहेत ते, त्यांचा पराक्रम संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | AHMEDNAGAR DISTRICT NEWS | NAGAR NEWS | SHARAD PAWAR | RADHAKRISHNA VIKHE | NILESH LANKA | SUJAY VIKHE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट यावेळी लोकसभेच्या १० जागा लढवत आहे. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव पाहाता १० जागा कमी असल्याचं बोललं जात होतं. मात्र आमचं लक्ष्य विधानसभा निवडणुकांवर असल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अमित शाहांच्या प्रश्नांवर खोचक प्रत्युत्तर दिलं आहे. शिवाय, अजित पवारांवरूनही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना टार्गेट केलं आहे. यावेळी नगर जिल्ह्यातील राजकारणाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी विखे पाटलांना टोला लगावला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला.
आपलं लक्ष्य विधानसभेवर असून तिथे जास्तीत जास्त उमेदवार विधानसभेत पाठवण्याचा आपला प्रयत्न राहील असं शरद पवारांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रात निवडणुकीचा पहिला टप्पा झाला. आणखी चार टप्पे आहेत. महाविकास आघाडीनं सगळ्या जागा लढवायचा निर्णय घेतला आहे. सुदैवाने एखाद्या, दुसऱ्या जागेचा विषय सोडला तर राज्यात जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये एकवाक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं लोकसभेच्या जागा कमी घेतल्या आहेत. हा निर्णय आम्ही जाणीवपूर्वक घेतला. आमचं अधिक लक्ष विधानसभेवर आहे असंही यावेळी पवार म्हणाले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
माझ्या काळात शेतीचं काय काम झालं, हे सगळ्या जगाला माहिती आहे.
अमित शाह यांनी शरद पवारांनी १० वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारला होता. या विचारलेल्या प्रश्नावर पत्रकारांनी पवारांना विचारणा केली असता त्यावर शरद पवारांनी अमित शाह यांनाच प्रतिप्रश्न केला आहे.अमित शाह ठिकठिकाणी मला विचारतात. २०१४ ते २०२४ या १० वर्षांत शरद पवारांनी काय केलं ? मी एवढंच सांगेन १० वर्षांत मी सत्तेत नव्हतो, अमित शाह सत्तेत होते. त्यामुळे या १० वर्षांत त्यांनी काय केलं हे सांगण्याची जबाबदारी त्यांची आहे. सत्तेत नसणाऱ्यांची नाही. त्यांच्याआधी १० वर्षं मी सत्तेत होतो, तेव्हा माझ्या काळात शेतीचं काय काम झालं, हे सगळ्या जगाला माहिती आहे असं हि शरद पवार म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पवारांचा विखेंना टोला.
शरद पवारांनी जिल्ह्यातल्या नेत्यांमध्ये भांडणं लावून जिल्ह्याचं वाटोळं केलं असं राधाकृष्ण विखे यांनी म्हटल्याबाबत विचारणा केली असता त्यावरही शरद पवारांनी टोला लगावला. त्यांच्याबद्दल भाष्य करणंही मला योग्य वाटत नाही. त्यांच्यात सातत्य नाही. कधी शिवसेनेत, कधी काँग्रेसमध्ये आता हल्ली कुठे आहेत ते ? भाजपामध्ये आहेत. या बाबतीत त्यांचा पराक्रम सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे असा टोला शरद पवारांनी लगावला आहे.