कुणी किती पैसे वाटा, योजना आणा, धुरळा उडवा, सरकार आमचंच, बारामतीच्या लाडक्या बहिणी पवारांना पराभूत करणार आहेत. – संजय राउत
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | POLITICAL NEWS | MP SANJAY RAUT | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.|
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे सरकार (महाविकास आघाडीचं) सरकार येणार असा दावा केला आहे. तसंच खासदार संजय राऊत यांनी अजित पवार यांच्या बाबतीतही मोठा दावा केला आहे. भाजपा महायुती हे निवडणूक घ्यायला घाबरत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
(संग्रहित दृश्य)
निवडणूक घ्यावीच लागेल कितीही इच्छा नसली तरीही….
महाराष्ट्राची निवडणूक घेण्याची इच्छा नसली तरीही भाजपला आणि महायुतीला निवडणूक घ्यावीच लागेल. निवडणुकीच्या तारखा मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जाईल. लोकसभा निवडणुकीतही त्यांनी सोयीच्या तारखा घेतल्या होत्या. मात्र जनता आणि आम्ही जागरुक आहोत. आम्हाला खोकेवाल्यांचं सरकार घालवायचं आहे. त्यामुळे नवं सरकार आलं पाहिजे यासाठी महायुतीला निवडणूक घ्यावीच लागेल कितीही इच्छा नसली तरीही खासदार राउत म्हणाले.
(संग्रहित दृश्य)
महाराष्ट्रात ठाकरे २ सरकार येणार…..
लोकसभेतला सर्व्हे त्यांच्या (महायुती) बाजूने होता. पण त्याचा त्यांना उपयोग झाला नाही. महाराष्ट्रातला सर्व्हे हा तर प्रतिकूल आहे. महाराष्ट्रात ठाकरे २ सरकार येणार, ठाकरे २ हे एक उदाहरण आहे. महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येईल असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ठाकरे १ सरकार मविआचं होतं. आता मविआचं सरकार येण्यापासून कुणीही थांबवू शकत नाही. कुणी किती पैसे वाटा, योजना आणा, धुरळा उडवा. निवडणूक वेळेत घ्यावी लागेल आणि आमचं सरकार येईल असंही राऊत म्हणाले.
हे पैसे त्यांच्या बापजाद्यांचे आहेत का ?
रवी राणाच नाही तर महाराष्ट्रातले नेते आणि मंत्री वारंवार हीच भाषा बोलत आहेत की १५०० रुपये देतो आहे. मतं द्या नाहीतर पैसे परत घेऊ. हे पैसे त्यांच्या बापजाद्यांचे आहेत का ? हा सरकारचा पैसा नाही, करातून आलेला पैसा आहे. यांची मानसिकता भ्रष्ट आहे. सरकारी पैशांतून त्यांना मतं विकत घ्यायची आहेत. आमचं सरकार येईल तेव्हा १५०० रुपयांत नक्की वाढ करु. असंही संजय राऊत म्हणाले.
ही योजना फक्त मतं विकत घेण्यासाठीची आहे.
रवी राणांनी १५०० रुपये परत घेण्याचं वक्तव्य केलं आहे. याचाअर्थ असा आहे की या ज्या लाडकी बहीणसारख्या योजना आहेत त्या लाडक्या बहिणींसाठी नाहीत. विधवा, परितक्त्या यांच्यासाठी नसून ही योजना फक्त मतं विकत घेण्यासाठीची आहे. या सरकारच्या भावना किती कलुषित आहेत हे दिसून येतं. पैसे काय त्यांच्या खिशातले आले का ? रवी राणांच्या पत्नी पराभूत झाल्या आहेत, त्यामुळे त्यांची मानसिकता तपासून घ्यावी लागेल. असंही संजय राऊत म्हणाले.
(संग्रहित दृश्य)
गद्दार आमदार ते निवडणुकीनंतर विधानसभेत दिसणार नाहीत.
लाडकी बहीण योजना चांगल्या हेतूने आणलेली नाही. ही योजना फक्त मतं विकत घ्यायला आणली आहे. अजित पवार बारामतीत पराभूत होणार आहेत. बारामतीच्या लाडक्या बहिणी त्यांना पराभूत करणार आहेत. महाराष्ट्रात जे सगळे गद्दार आमदार ते निवडणुकीनंतर विधानसभेत दिसणार नाहीत. लाडक्या बहिणीच त्यांचा पराभव करणार आहेत. लाडक्या बहिणी लाचार नाहीत, त्यांच्या बाबत बोलणारे सगळे लोचट मजनू आहेत. त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.