पुणे : शाळेत जाण्यासाठी निघालेल्या चौथीतील मुलीवर २७ वर्षीय नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यातील वाघोली परिसरात घडली आहे. या प्रकरणातील आरोपीला वाघोली पोलिसांनी अटक केली असून या घटनेमुळे वाघोली परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता चौथीमध्ये शिक्षण घेणारी पीडित मुलगी आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घरातून शाळेत जाण्यास निघाली होती. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर एक पिठाची गिरण आहे. त्या पिठाच्या गिरणीत कामाला असलेल्या २७ वर्षीय आरोपीने तिला अडवले तुला खाऊ देतो असे आमिष दाखवून आरोपीने पीडित मुलीला पिठाच्या गिरणीत घेऊन गेला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. काही वेळाने गिरणीपासून काही अंतरावर पीडित मुलगी रडत चालली होती,रस्त्यावरून जाणार्या येणार्या नागरिकांनी तिला रडतांना पाहिले. त्यावेळी काही नागरिकांनी मुलीकडे विचारपूस केल्यावर तिने घडलेला प्रकार सांगितला.नागरिकांनी तात्काळ पोलिसांना याबाबत माहीती दिली. या घटनेची माहीती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल होऊन आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा आरोपीकडे वाघोली पोलीस अधिक तपास करीत आहे.