तो आरोपी थेट महिला वकिलाच्या घरात घुसला अन् मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्रेच नेले……
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | CRIME NEWS | KOTWALI POLICE STATION, AHMEDNAGAR | ROBBERY AT THE HOUSE OF A LAWYER | FILE A CASE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – मोक्का गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपीने गुन्ह्याचे वकिलपत्र असलेल्या महिला वकिलाच्या घरात घुसून मारहाण केली. घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्रे असा एक लाख ९२ हजार ७०० रूपयांचा ऐवज लंपास केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
तो विनापरवाना महिला वकिलाच्या घरात घुसला.
गुरूवारी (८ ऑगस्ट) रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास काटवन खंडोबा परिसरातील सप्तपदी मंगल कार्यालयाच्यामागे ही घटना घडली आहे. या प्रकरणी अॅड. नाजमीन वजीर बागवान (वय ३२) यांनी रात्री उशिरा दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण बबन कोळपे (रा. विळद ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. किरण कोळपे विरोधात २०२२ मध्ये एमआयडीसी पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्याचे वकिलपत्र फिर्यादी यांच्याकडे होते. त्यावेळी फिर्यादी व किरण यांची ओळख झाली होती. किरण विरोधात २०२३ मध्ये राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला होता.त्याला या गुन्ह्यात अटक झाली होती व नंतर जामीन मिळाला होता.
दरम्यान, गुरूवारी दुपारी साडेचारच्या सुमारास फिर्यादी त्यांच्या काटवन खंडोबा येथील घरी असताना किरण तेथे आला. त्याने फिर्यादीच्या घरात प्रवेश करून फिर्यादीचा बळजबरीने हात पिरगाळून दुखापत केली. घरातील कपाटाची उचकापाचक करून त्याने साडेतीन तोळ्याचे सोन्याचे गंठण, कानातील सोन्याच्या साखळ्या, ३२ हजार ७०० रूपयांची रोकड व किरण याच्याविरूध्द दाखल मोक्का कोर्ट केस कामकाजाचे मुळ कागदपत्रे नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.