बॉलीवूडचा जवान अर्थात बॉलीवूडचा किंग खानच्या हाताला धरून २००७ मध्ये ओम शांती ओम मधून बॉलीवूडमध्ये आपले करियर अजमावणारी दीपिका पदुकोन आज यशस्वी अभिन्नेत्रींच्या यादीत समाविष्ट झाली आहे. शांतीचं पात्र घेऊन बॉलीवूडमध्ये प्रवेश करणारी दीपिका पदुकोन आज शांत नसल्याचे चित्र दिसत आहे. एकेकाळी बेशरम रंग करत विरोधकांच्या टीकेच्या निशाण्यावर असलेली दीपिका त्याच विरोधकांना झुमे जो पठाण गाण्यावर नाचायला लावते. शांती नावच पत्र अखेर झुमतय अस म्हणायला हरकार नाही.
५८ वर्षाच्या शाहरुख खानची ३७ वर्षाची आई, शाहरुख पेक्षा २१ वर्ष लहान आई होती हि अभिनेत्री …!
अनेक सिनेमांमध्ये शाहरुख खानच्या प्रेमिकाची भूमिका साकारता – साकारता दीपिका पदुकोन जवान सिनेमामध्ये थेट शाहरुखची आईच झाली होती. ५८ वर्षाच्या शाहरुख खानची ३७ वर्षाची दीपिका आई झाली होती.शाहरुख खान पेक्षा तब्बल २१ वर्ष लहान असलेल्या दीपिकाने अत्यंत उत्तमपणे भूमिका साकारली होती. पठाणमध्ये बचावलेली दीपिका अखेर जवान सिनेमामध्ये आपला जीव गमावते, या वर्षी (२०२३) दीपिका पदुकोनचे २ मोठे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले होते.दोन्ही चित्रपटांनी कोट्यावधी रुपयांचा गल्ला जमावाला होता.दीपिकाने पदुकोनणे आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावलं. मात्र दीपिकाच्या अभिनयाचं जेवढं कौतुक होतं तेवढीच ती अनेक कॉंट्रोव्हर्सीमुळेही सोशल मीडियावर चर्चेत असते.
दीपिकाला रणवीर सिंह सोबत नाही तर ५६ वर्षीय अभिनेत्याच्या बाळाची आई व्हायची इच्चा होती.
दीपिकाचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यात ती हॉलिवूड अभिनेता विन डीजलसोबत दिसत आहे. हा व्हिडिओ त्यांच्या चित्रपटाचा प्रमोशनदरम्यानचा आहे. ‘द एलेन डिजेनर्स शो’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती. याच कार्यक्रमात तिने विनबद्दल केलेलं वक्तव्य आता चर्चेत आहे. तिने आपल्याला विन आवडत असल्याचं सांगितलं आहे. या व्हिडिओमध्ये दीपिका म्हणते, ‘मी विन डीजलची मोठी चाहती असून त्याच्या मुलाची आई होण्याचाही मी विचार केला होता.’ दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करायला सुरुवात केली आहे.दीपिकाने विनबद्दल हे वक्तव्य केलं तेव्हा तिचा अभिनेता रणवीर सिंहसोबत साखरपुडा झाला होता. त्यामुळे रणवीरचे चाहतेही तिच्यावर प्रचंड नाराज होते. आता तिचं वक्तव्य पुन्हा चर्चेत आल्याने दीपिका पुन्हा एकदा ट्रोल होताना दिसतेय. दीपिकाने २०१७ मध्ये ‘XXX: Return Xander Cage’ या चित्रपटात विन डिजल याच्यासोबत दिसली होती.
बॉलिवूड किंग शाहरुख खान प्रमाणेच दीपिका पदुकोणसाठीही हे वर्ष खूप खास होतं. या वर्षात प्रदर्शित झालेले तिचे दोन्ही चित्रपट तुफान गाजले. ‘पठान’ या
चित्रपटामध्ये दीपिका पदुकोण हिची मुख्य भूमिका होती. तर, ‘जवान’मध्ये तिने कॅमिओ केला होता. दोन्हीही चित्रपटांना प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला होता.शाहरुख खानने दिलेल्या मुलाखतीत सांगितले कि आम्ही पठाण सिनेमाचे चित्रीकरण करत असतांना मी माझ्या सेक्रेटरीला म्हणालो कि दीपिकाला विचार ती जवानमध्ये पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारेल का ? त्यावर दीपिकाला विविचारले असता शाहरुखसाठी काहीपण म्हणत तिने होकार दिला होता. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर स्वतःची भूमिका पाहून भरून गेली होती असा शाहरुख सांगतो. येत्या वर्षात देखील दीपिकाचे अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
दीपिका पदुकोन ह्रितिक रोशन सोबत ‘फायटर’ झळकणार
नव्या वर्षात २०२४ जानेवारी महिन्यात दीपिकाचा ‘फायटर’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटात ती हृतिक रोशनसोबत झळकणार आहे. तर, येत्या वर्षात
‘कल्की २८९८ एडी’ आणि ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातही ती झळकणार आहे.दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनचा ‘फायटर’ चित्रपट येत्या २५ जानेवारी २०२४ ला रिलीज होणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. आता ह्या टीझरनंतर चित्रपटातलं पहिलं वहिलं गाणं रिलीज झालं आहे.‘शेर खुल गये’ असे गाण्याचे बोल असून या गाण्यामध्ये दीपिका पादुकोण आणि हृतिक रोशनच्या डान्सने सर्वांचेच लक्ष वेधले.
दीपिका रणवीर.
अभिनेत्री दीपिका पदुकोन व अभिनेता रणवीर सिंह यांचा २०१८ साली इटली येथे राजेशाही थाटात विवाहसोहळा पार पडला. देशभरात या लग्नाची चर्चा झाली.
मोजके कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत दीपिका रणवीर चा विवाह संपन्न झाला. या लग्नाच्या फोटोंची सर्वांनाच उत्सुकता होती. पण पाहुण्यांना मोबाइल न आणण्यास सांगितल्याने आणि कडक नियमांमुळे एकही फोटो व्हायरल होऊ दिला नव्हता. हा विवाहसोहळा इतक्या खासगी पद्धतीने करण्यामागचं कारण दीपिकाने नंतर सांगितलं आहे. लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत तिने या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.अभिनेता शाहरुख खान याच्यापेक्षा दीपिका २१ वर्ष तर रणवीर सिंग २० वर्षांनी लहान आहे.