चिचोंडी पाटील मयत अंगणवाडी सेविका उमा महेश पवार यांना न्याय मिळण्या साठी सदर गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी असा महत्वाच्या मागण्यांसाठी ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी ठिय्या आंदोलन करत अंत्यसंस्कार रोखून धरला. पोलीस आणि जिल्हा प्रशासनासोबत चर्चा आणि लेखी आश्वासन मिळाल्यानंतर अखेर आज दुपारी ११.४५ वाजता चिचोंडी पाटील अमरधाम येथे शोकाकूल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. चिचोंडी पाटील येथील भातोडी रस्त्यावरील मारुतीवाडी येथील मिनी अंगनवाडी सेविकेवर २४ अक्टोबर रोजी दुपारी बलात्कार करून निघृण खून करण्यात आला होता. पुरावा नष्ट करण्यसाठी नदी पात्रात फेंकण्यात आला होता. घटनेच्या अवघ्या १२ तासाच्या आत अहिल्यानगर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आरोपीला अटक करत गुन्ह्याची उकल केली होती. संतप्त ग्रामस्थांनी दोन दिवस स्वयंस्फूर्तीने गावातील सर्व दुकाने बंद ठेवले होते. तर काल रात्री कँडल मार्च देखील काढण्यात आला होता.
शनिवारी २६ अक्टोबर रोजी मयत अंगणवाडी सेविकेचे पार्थिव अत्यसंस्कारसाठी रुग्ण वाहिकेने आण्यात आले. सकाळी ग्रामपंचायत कार्यालयासमोर शोक सभा झाली. यावेळी खासदार निलेश लंके, आमदार बबनराव पाचपुते , माजी आमदार राहुल जगताप , डॉ संजय कळमकर, पत्रकार विठ्ठल लांडगे, सुर्यकात नेटके, सरपंच शरद पवार , माजी सभापती प्रवीण कोकाटे आदि सह तालुक्यातील आणि परिसरातील अनेक राजकीय नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंत्यसंस्कारसाठी पार्थिव वाहनातून ग्रामपंचायत जवळ आणण्यात आले. त्यावेळी खासदार नीलेश लंके व गावातील पदाधिकारी अंगणवाडी सेविकाच्या हस्ते मागण्याचे निवेदन पुलिसांकडे दिले. अंत्ययात्रा पुढे घेण्याचा प्रयत्न सुरु असतांना नातेवाईक आक्रमक होत प्रशासनाकड्न लेखी अश्वासनाची मागणी करत ठिय्या मांडला. अखेर प्रशासनाने आर्थिक मदत मिळवून देण्यासाठीचे आणि गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी चोख बंदोबस्त ठेवत मध्यस्थीची भूमिका निभावली.
(संग्रहित दृश्य.)
अंगणवाडी सेविका मध्ये ही असुरक्षेची भावना.
आमदार बबनराव पाचपुते म्हणाले कि झालेल्या निंदनीय दुघर्टनेमुळे कुटुंबिय आणि नातेवाईकांच्या दुःखमध्ये मी सहभागी आहे. या ताईला न्याय मिळावा यासाठी मी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे बरोबर चर्चा केली आहे. आंगणवाडी सेविकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अंगणवाडी सेविकामध्ये ही असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे. वस्त्यावरील मिनी अंगणवाड्यात फक्त सेविकाच आहेत. तेथे मदतनिस असल्यास भीती वाटणार नाही.