ब्राम्हणांचा शाप आता लागत नाही. ते ओरिजनल नाही तर मटण खाणारे ब्राम्हण आहेत. – नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | BJP | CONGRESS | DEVENDRA FADNAVIS | NANA PATOLE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मी कुणाच्या नादी लागत नाही, कुणाचं वाईट चिंतत नाही, परंतु माझ्याशी विश्वासघात केला की त्यांचा सत्यनाश होतो असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अकलूज येथे जाहीर सभेत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या या वक्तव्यावर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पलटवार यांनी केला आहे. ब्राम्हणांचा शाप आता लागत नाही. ते ओरिजनल नाही तर मटण खाणारे ब्राम्हण आहेत. असे म्हणत नाना पटोले यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले असेही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांच्या शापाला अर्थ नाही. यासह २०१४ ला सत्तेत येण्यासाठी जी काही आश्वासनं दिली गेली होती. जसं की, मराठे-धनगर विविध समाजाला न्याय देऊ… त्यांचं काय झालं.. ज्यांनी महाराष्ट्राचा सत्यानाश केला. शाहू-फुले-आंबेडरांच्या विचारांना काळीमा लावला, अशा देवेंद्र फडणवीस यांना हे बोलण्याचा आणि असा शाप देण्याचा अधिकार नाही असेही पटोले म्हणाले.