राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. येत्या २० नोव्हेंबरला राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहायला मिळणार आहे. आता विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचं नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवले आहे.
(संग्रहित दृश्य.)
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतंच एक पत्रक जारी केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतंच एक पत्रक जारी केले आहे. भारत निवडणूक आयोगाने २६ मार्च २०२४ रोजी निर्गमित केलेल्या मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये महाराष्ट्र राज्यासाठीच्या राज्यस्तरीय पक्षांच्या यादीमध्ये नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार या पक्षाचा समावेश केला आहे. या पक्षाला Man Blowing Turha हे चिन्ह देण्यात आले होते. या चिन्हाचे मराठी भाषांतर निवडणूक चिन्हांच्या तक्त्यामध्ये तुतारी वाजविणारा माणूस, असे करण्यात आले होते. या दोन्हीही चिन्हांमध्ये सार्धम्य असल्याने प्रचारा दरम्यान मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे तुतारी हे मुक्त चिन्ह असलेल्या चिन्हाचे मराठी भाषांतर Trumpet असे केले जावे, अशी विनंती राष्ट्रवादी शरद पवार गटाने मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडे ही विनंती करण्यात आली होती.