नेवासे तालुक्यातील गोधेगाव येथील शेतकरी दादा सारंगधर जाधव व त्यांचा मुलगा शिवाजी दादासाहेब जाधव (रा. गोधेगाव, ता. नेवासे) यांच्यात शेती वाटपाच्या कारणावरून सतत वाद होत होता.या भांडण- तंट्याच्या वादातून दादा जाधव यांनी मुलगा शिवाजीच्या डोक्यात लाकडी फळीने मारहाण करून खून केल्याची घटना मंगळवारी (ता.१४) सायंकाळी सुमारास घडली. पाच वाजण्याच्या सुमारास १८ मे रोजी मृतदेहाची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने गुन्ह्यांची उकल झाली आहे.शिवाजीची आई अलका दादासाहेब जाधव हिच्या फिर्यादीवरून आरोपीस ताब्यात घेऊन दादा जाधव याच्याविरुद्ध नेवासे पोलिस ठाण्यात ३०२ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाणे करीत आहेत.