DR.APJ ABDUL KALAM BIOPIC : भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हे आजही अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी व्यक्तीमत्व आहेत. मिसाइल मॅन म्हणूनही ते जगभरात ओळखले जातात. लवकरच आता त्यांचे आयुष्य मोठ्या पडद्यावर उलगडले जाणार आहे. भारताचे ११ वे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या आयुष्यावर बायोपिक येणार आहे. आदिपुरुषचे दिग्दर्शक ओम राऊत हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. तर चित्रपटात मुख्य भूमिकेत साउथचा सुपस्टार झळकणार आहे. सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल सुरू आहे. येथे जगभरातील फिल्ममेकर्स त्यांच्या चित्रपटांचे स्पेशल स्क्रीनिंग करत आहेत. याच दरम्यान तानाजीसारखा सुपरहिट चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे ओम राऊत हे देखील या फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत. तिथे त्यांनी त्यांचा आगामी चित्रपट कलाम याची घोषणा केली आहे. या चित्रपटात साउथचा सुपरस्टार धनुष ए.पी.जे कलाम यांच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट कलाम यांच्या विंग्स ऑफ फायर या पुस्तकावर आधारित असणार आहे. यात त्यांचे बालपण ते राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
(संग्रहित दृश्य.)
कलामांसारखे नेते राजकारणाव्यतिरिक्त एक असामान्य व्यक्ती म्हणून जगले.
चित्रपट अभिषेक अग्रवाल आणि भूषण कुमार निर्मात करणार आहेत. धनुष आणि ओम राऊत दोघेही राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आहेत. त्यामुळं दोघांना एकत्र काम करण्यास पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. चित्रपटाची रिलीज डेट अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कलाम चित्रपटाच्या आधी धनुषची तेरे इश्क मे हा चित्रपट रिलीज होणार आहे. आनंद एल.राय या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात कृती सेननदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कलाम चित्रपटाबद्दल चाहते फार उत्सुक आहेत. चित्रपटाची कथा सायवन क्वाद्रस यांनी लिहली आहे. यापूर्वी त्यांनी नीरजा, मैदान यासारख्या दमदार बायोपकची कथा लिहली आहे. या चित्रपटात आता डॉ, कलाम यांचे आयुष्य उलगडणार आहे. ओम राऊतने चित्रपटाबद्दल बोलताना म्हटलं होतं की, आजच्या काळात खऱ्या नेत्यांची कमतरता आहे तिथे कलामांसारखे नेते राजकारणाव्यतिरिक्त एक असामान्य व्यक्ती म्हणून जगले.