चारित्र्यावर संशय घेऊन सचिनने स्वतःच्या बायकोचा गळा चिरला, अन् थेट पोलीस ठाण्यात….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | SHEVGAON CRIME NEWS | WIFE'S MURDER DUE TO HUSBAND AND WIFE'S DISPUTE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : जिल्ह्यातील गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत. आता महिलेची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे. पतीनेच पत्नीचा गळा चिरून हत्या केली आहे. चारित्र्यावर संशय असल्याच्या कारणातून ही हत्या झाली असल्याची प्राथमिक माहिती आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही हत्या करून पती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आहे. ही घटना शेवगाव शहरात ब्राम्हण गल्लीत घडली आहे. सचिन दिलीप काथवटे (वय ३५, रा.ब्राम्हण गल्ली, शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. सचिनने पत्नीचा गळा चिरून हत्या केल्यानंतर आरोपी पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला आहे.
(संग्रहित दृश्य.)
पत्नीची चाकूच्या सहाय्याने गळा चिरून हत्या……
ही घटना शुक्रवारी (दि.२३) रोजी पाहटे दिड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याबाबत सुरेश भिवाजी मोरे (रा. बुलढाणा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन हा कायम आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यातून त्यांचे सातत्याने वाद होत होते. शुक्रवारीही त्यांचे वाद झाले होते. त्यातून आरोपीने पत्नीची चाकूच्या सहाय्याने गळा चिरून हत्या केली. या संदर्भात आरोपीविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.नि. समाधान नागरे व हे. कॉ. कैलास काळे करत आहेत. अहमदनगर जिल्ह्याचा विचार जर केला तर जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना वाढलेल्या दिसतात. हाणामारी, खून, चोऱ्या आदी घटना जिल्ह्यात जास्तच झालेल्या आहेत. यावर पोलिसांनी अंकुश ठेवला पाहिजे अशी इच्छा नागरिक व्यक्त करत आहेत.