नवी दिल्ली : पहलगाम येथे (दि.२२) एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारतीय सैन्याकडून बदला घेण्यात आला आहे. बुधवारी ( दि.७ मे) पहाटे १.३० वाजताच्या सुमारास भारताने पाकिस्तान एअर स्ट्राइक केला. पहलगाममध्ये भारतीय महिलांच्या कपाळांवरील सिंदूर पुसणाऱ्या आंतकवाद्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला सळो की पळो करून सोडले आहे. पण या हल्ल्यानंतर आता पाकिस्तान बिथरला असून पाकिस्तान सैन्याकडून भारतीय सीमेवर वारंवार अंदाधुंद गोळीबार करण्यात येत आहे. या गोळीबारात आतापर्यंत १५ निष्पाप लोकांचा मृत्यू झाला असून एक जवानही शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. दिनेश कुमार शर्मा असे शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या जवानाचे नाव आहे. बुधवारी भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक करत पाकड्यांना चांगलाच धडा शिकवला आहे. भारताच्या या हल्ल्यामुळे पाकिस्तान मात्र बिथरला आहे. कारण पाकिस्तानकडून गेल्या काही तासांमध्ये जोरदार हल्ले करण्यात येत आहे. पण भारतही पाकच्या या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत आहे. पुँछ राजौरी आणइ उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला आणि कुपवाडा या भागात वारंवार गोळीबार करण्यात येत आहे. यामध्ये आतापर्यंत १५ नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ज्या भागात पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. तेथील नागरिकांना विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. तर पूँछ येथील भारतीय सीमेवर पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात जवान दिनेश कुमार शर्मा हे गंभीर जखमी झाले होते. ज्यानंतर त्यांना तत्काळ जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ज्यानंतर डॉक्टरांनी दिनेश कुमार यांना वाचविण्याचा पूर्णतः प्रयत्न केला. परंतु डॉक्टरांना दिनेश यांना वाचवण्यात अपयश आले. ज्यानंतर लान्स नायक दिनेश कुमार शर्मा शहीद झाल्याची माहिती भारतीय सैन्याकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आली. जवान दिनेश कुमार शर्मा हे हरियाणाचे होते. परंतु पाकिस्तानकडून सतत होणाऱ्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना त्यांना वीरमरण आले.