दोन अज्ञात व्यक्तींनी अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर आज (१४ एप्रिल) पहाटे गोळीबार झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी सलमानच्या घराबाहेर अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेवर विविध नेते मंडळी प्रतिक्रिया देत आहेत. अशाताच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
मुख्यमंत्र्यांनी केला सलमानला फोन.
गोळीबार घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनी सलमान खानला फोन केला होता. सलमानसोबत झालेल्या संवादाबद्दल देखील एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते म्हणाले सलमान खान आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यासाठी मुंबई पोलिस आयुक्तांना सूचित करण्यात आले आहे. मी सलमान खानशीही बोललो आहे. मी त्यांना सांगितले आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांनी काळजी करण्याची गरज नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले..
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले ही दुर्दैवी घटना आहे.पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. आरोपींना पकडून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कायदा हातात घेणाऱ्यांना सोडले जाणार नाही.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सुप्रिया सुळेंची गृह खात्यावर टीका
सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर सुप्रिया सुळेंनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी गृह खात्यावर टीका केली. त्या म्हणाल्या हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण सलमान खान ज्या भागात राहतो तो भाग खूप प्रसिद्ध आहे. तिथे सकाळी लोक मॉर्निंग वॉकला जातात तसेच भाजीवाले-दुधवाले तिथे येतात त्यांच्या सुरक्षेचं काय ? हे गृह खात्याचे अपयश आहे. सलमानच्या कुटुंबावर दबाव आहे.
बिश्नोई गँगने जबाबदारी स्वीकारली
अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात बिश्नोई गँगचा हात असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला होता. यामुळे या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्यात आला आहे. दरम्यान अनमोल बिश्नोई नावाच्या अकाऊंटवरून या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. मात्र हे अकाउंट फेसबुक वर सर्च केलं जाऊ शकत नाही. अकाउंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. पोलीस याची सत्यता पडताळून पाहत आहेत.