By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या अहंकारचा पराभव, विधानसभेच्या निकालावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > राजकारण > उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या अहंकारचा पराभव, विधानसभेच्या निकालावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
राजकारण

उद्धव ठाकरे, संजय राऊतांच्या अहंकारचा पराभव, विधानसभेच्या निकालावरून किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.

Last updated: 2024/11/23 at 2:51 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

विधानसभेच्या निवडणुकीचं मतमोजणी सुरु आहे. पुढील काही तासांत निकाल स्पष्ट होणार आहे. या निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलं आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या कलानुसार महायुतीला जास्त जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या निकालावर आता राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि राहुल गांधी हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांच्या अहंकाराचा हा पराभव आहे, असं म्हणत किरीट सोमय्या यांनी ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दोन हजारांचा दंड, आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला - Marathi News | uddhav thackeray and sanjay raut fined 2 thousand and application for acquittal rejected | Latest ...(संग्रहित दृश्य.)

कोणाचं सरकार येणार?

राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांनी व्होट जिहादसाठी मालेगावमध्ये पैसे पाठवले होते. आतापर्यंत ईडीने ३६३ कोटी रुपये रिकव्हर केले आहे. आता विधानसभेचा हा जो पराभव आहे तो उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी कोवीडच्या काळात केलेल्या घोटाळ्याचा आणि त्यांच्या अहंकाराचा पराभव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महायुतीच्या सरकारने गेल्या दोन अडीच वर्षांत मोठ्या प्रमाणात विकासाचं काम केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं, हम एक है तो सेफ है. योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, बंटेंगे तो कटेंगे आणि देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की व्होट जिहादच्या विरोधात धर्म युद्ध. महाराष्ट्राने व्होट जिहादला कशा पद्धतीने रोखलं जाऊ शकतं? हे दाखवून दिलं आहे, असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं. महाराष्ट्रात काय होणार? कोणाचं सरकार येणार? महायुतीला किती जागा मिळणार? महाविकास आघाडीच्या किती जागा येणार? दरम्यान, महायुतीमध्ये भाजपा १३१ शिंदे सेना ५५ आणि अजित पवार गट ३५ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकास आघाडीचे उमेदवार अवघ्या ६० जागांवर आघाडीवर आहेत. मविआत काँग्रेस २२, ठाकरे गट २० आणि शरद पवार गटाचे १६ उमेदवार आघाडीवर आहेत. लोकांनी विकासाच्या बाजूने मतदान केली आहे. धर्मयुद्ध आणि एक है तो सेफ है चा नारा जनतेने मान्य केला आहे. आता राज्याचा विकास वेगाने होईल. महायुतीने २०० जागांवर आघाडी घेतली आहे. मी जनतेला नमन करतो, लाडक्या बहिणींना सलाम करतो. एवढंच नाही तर खरी शिवसेना कोण याचं उत्तरही जनतेने दिलं आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जो पक्ष सर्वात मोठा असेल त्याचा मुख्यमंत्री होईल. मला वाटतं की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील.

You Might Also Like

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

तर राजकारणात त्याचे कसे तुकडे करायचे ठरवू , उद्धव ठाकरेंचा मातोश्री वर यल्गार ?

अजित पवार दोषी असेल तर फासावर लटकवा, वैष्णवी हागवणे मृत्यूप्रकरणी अजित पवारांनी संतप्त प्रतिक्रिया ; म्हणाले असले नालायक लोक मला……

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढील चार महिन्यात? प्रभाग रचना प्रक्रियेला सुरुवात

आगामी महापालिका महायुती म्हणून एकत्र लढणार, पण… स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितल…

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीसच होणार, भाजपाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य.
Next Article हा विजय आमच्या कामाची पोचपावती व लाडक्या बहिणींचे प्रेम आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?