TIMES OF AHMEDNAGAR
अजय आणि विजय (बदललेले नाव) हे दोघे भाऊ वडिलोपार्जित सुरादेवी परीसरातील विटाभट्टीचा कारखाना सांभाळत होते. अजयला दारूचे व्यसन असल्यामुळे तो पत्नीशी नेहमी वाद घालून तिला मारहाण करायचा. त्यावेळी विजय हा वहिनीची बाजू घेऊन भावाची समजूत घालत होता. त्यामुळे वहिनीचे दिराशी मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले होते. काही दिवसांत दोघांचेही चांगले पटत होते. विजय घरातील कामात वहिनीला नेहमी मदत करत होता. त्यामुळे दोघांमध्ये सूत जुळले. दोघांचेही अनैतिक संबंध निर्माण झाले. यादरम्यान विजयचे लग्न झाले. त्यानंतरही विजयचे वहिनीशी अनैतिक संबंध कायम होते.
स्त्रोत. सोशल मिडिया.
एकाच कुटुंबात राहणाऱ्या मोठ्या भावाच्या पत्नीसोबत दिराचे अनैतिक संबंध जुळले. घरातच दिरासोबत ‘नको त्या’ अवस्थेत भावाला पहिल्याने दोन भावात वाद झाला. त्यानंतर पत्नीला नेहमी मारहाण करीत त्रास देत असल्यामुळे भावाचा लहान भावाने खून केला. विटाभट्टीच्या मातीत त्याचा मृतदेह पुरला. मात्र, पोलिसांनी या हत्याकांडाचा तपास लावून दोघांना अटक केली आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया.
वाहिनी आणि दीर एकाच बेडवर अन त्याने खिडकीतून बघितले.
बेडरुममध्ये वहिनी आणि दिर एकाच बेडवर झोपले होते. दरम्यान, दारुडा असलेला अजय घरी आला. त्याने खिडकीतून दोघांनाही ‘नको त्या’ अवस्थेत बघितले. त्याचा पारा चढला. त्याने भावाला मारहाण केली आणि त्यानंतर पत्नीलाही जबर मारहाण केली. त्यानंतर दोघांनाही अनैतिक संबंधाची बाजू धरुन मारहाण करीत होता. अन्य कुटुंबियांना दोघे भावात काय घडले, याची कल्पना नव्हती. वारंवार पती मारहाण करीत असल्यामुळे पत्नी माहेरी निघून गेली. तेव्हापासून विजयनेही विटाभट्टीतच एक खोली तयार केली आणि तेथेच राहू लागला.
स्त्रोत. सोशल मिडिया.
सात लाखांत संपवले.
अजय विजयला व आई-वडिलांना मारहाण करायचा. त्यानंतर तो पत्नीच्या माहेरी जाऊन देखील तिला मारहाण करत होता. अजयचा वाढता त्रास बघता मे २०२३ मध्ये विजयने शहरद या वाहनचालकाला ७ लाखांत सुपारी दिली. विजय आणि शरदने अजयच्या डोक्यात सत्तूर घालून खून केला. विटाभट्टीतच मृतदेहाची विल्हेवाट लावली. तेव्हापासून घरात शांतता होती तर या हत्याकांडाची कुणकुणही कुणाला नव्हती.
अशी आली घटना उघकीस.
गेल्या ८ ते ९ महिन्यांपासून या हत्याकांडाचा उलगडा झाला नाही. मात्र, शरदने सुपारीचे पैसे मागितले असता चंदूने १ लाख रुपये दिले आणि उर्वरित पैसे देण्यासाठी टाळाटाळ करीत होता. मनोहर नेहमी दारूच्या नशेत घरी येऊन पैसै न दिल्यास पोलिसांना सांगेल, अशी धमकी देत होता. शेवटी त्याने दारुच्या नशेत अनेकांना खून केल्याचे सांगितले. कोराडी पोलिसांनी त्याची चौकशी केली असता हत्याकांडाची कबुली दिली. अशाप्रकारे अनैतिक संबंधातून खूनाच छडा लागला.