वनराज आंदेकरांवर हल्ल्याचे असे झाले प्लॅनिंग ; हत्याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | PUNE | PUNE CRIME NEWS | PUNE POLICE | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून,कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना काल सायंकाळी घडली. या घटनेत वनराज आंदेकरांचा मृत्यू झाला असून कौटुंबिक वाद आणि पैसे यावरून हा खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. सदर प्रकरणी आता पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतलं आहे. वनराज आंदेकर हत्याप्रकरणी पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आलेल्या तीन जणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. पुण्यातील नाना पेठ परिसरात काल रात्री वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी बंदुकीतून गोळ्या झाडून कोयत्याने वार करुन खून केला होता. वनराज आंदेकर यांच्यावर पूर्ववैमनस्यातून निकटवर्तीयाकडून गोळीबार झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले.
पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी बोलताना सांगितलं की रविवारी संध्याकाळी (२ सप्टेंबर) साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले होते त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र या आरोपींचा शोधघेण्यासाठी आमचं पथक रवाना करण्यात आलेले आहेत.
(संग्रहित दृश्य.)
गुन्हेगार डोकं वर काढतायेत !
एका टू दुचाकीवरून दोघं जण आले आणि त्यांनी थेट वनराज आंदेकर यांच्यावर फायरिंग केली होती. गोळीबार करून कोयत्याने वार देखील करण्यात आले होते. दरम्यान हल्ला करण्यापूर्वी आरोपींनी अगोदर चौकातील लाईटही घालवली होती. शिवाय आपल्यामध्ये एकजूट असल्याचा अंदाज घेत आरोपींनी आंदेकर यांच्यावर हल्ला केलाय. घरातील कार्यक्रम असल्यामुळे आंदेकर यांच्यासोबत इतर सहकारी नव्हते. नेमकी हीच संधी साधून दुचाकीवरून आलेल्या तीन ते चार जणांनी आधी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर कोयत्याने वार केले. दरम्यान पुण्यात पुन्हा एकदा गुन्हेगार डोकं वर काढताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांची भीती कुठे राहिली आहे का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.