अहमदनगर शहरात विमानतळ व्हावे तसेच खासदार शरद पवार यांच्या निधीतून एयर अॅम्बुलंस मिळावी विनोद साळवेंची मागणी.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | NATIONALIST CONGRESS PARTY (SHARAD PAWAR GROUP) | VINOD SALVE NEWS | AIRPORT DEMAND IN AHMEDNAGAR CITY | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तारलेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तरुणांच्या रोजगाराचा तसेच इतर समस्यांचा मोठा प्रश्न उपस्थित होत असतो.अनेक राजकीय नेत्यांची शहराच्या विकासासाठी धावपळ सुरु असते. जिल्ह्यासह शहराचा विकास व्हावा यासाठी नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा असतात.
(संग्रहित दृश्य.)
खासदार शरद पवार यांच्या निधीतून एयर अॅम्बुलंस मिळावी.
अहमदनगर शहरात विमानतळ व्हावे तसेच खासदार शरद पवार यांच्या निधीतून एयर अॅम्बुलंस मिळावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटक सचिव विनोद साळवे यांनी माजी.केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांची भेट घेऊन मागणी केली आहे. प्रदेश संघटन सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) अहमदनगर वासीयांची मागणी आहे की नगर जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने विस्तारलेला आहे आणि शहरासह जिल्हा आता विकासाकडे वाटचाल करत आहे. शहरातील नागरिकांना विमानाने प्रवास करायचा असेल तर पुणे-मुंबई व औरंगाबाद येथे जावे लागते. तरी नगर जिल्हयाच्या दृष्टीकोनातून विमानतळ हा विकासात्मक मौलाचा दगड उरेल यात शंका नाही म्हणून आपण याच्यासाठी पुढाकार घेऊन हे काम मार्गी लावण्याच्या दृष्टीकोनातून प्रयत्न करावे नगरकर आपले कायमस्वरुपी ऋणी राहतील अशी विनंती करत साळवे यांनी शरद पवारांची भेट घेऊन निवेदन दिले असल्याची माहिती टाइम्स ऑफ अहमदनगर शी बोलतांना दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
लोकसभेच्या निवडणुकीनंतर सळवेंवर मोठी जबाबदारी.
विनोद साळवे यांनी यापूर्वी शहर अध्यक्ष युवक कॉंग्रेस (शेवगाव),युवक कॉंग्रेस सरचिटणीस तसेच सेवादलचे अध्यक्ष म्हणून देखील साळवेंनी जबाबदारी पार पाडली आहे. नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांच्या लोकसभेची जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपने जबाबदारी पार पाडल्याने साळवे यांच्यावर महाराष्ट्र राज्याच्या संघटक सचिव पदाची जवाबदारी सोपवण्यात आली आहे. साळवे यांनी यापूर्वी माजी.आमदार चंद्रशेखर घुले,घनशाम शेलार,राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार) जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,अभय आव्हाड (माजी.नगराध्यक्ष पाथर्डी),सिद्धार्थ मुरकुटे, आदि बड्या नेत्यांसोबात काम केले आहे. साळवे यांचे सामाजिक कामात देखील मोठे योगदान आहे.