TIMES OF AHMEDNAGAR
लोकसभा निवडणुकीच्या एकूण सात टप्प्यांपैकी पाच टप्प्यातील मतदान पार पडले. तसेच महाराष्ट्रातील पाचही टप्प्यांतील मतदान आता पूर्ण झाले आहे. आता ४ जून रोजी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. निकाल लागेपर्यंत ईव्हीएम मशीन्स या एका गोदामात ठेवल्या जातात. ईव्हीएम मशीन्स ठेवलेल्या गोदामाला स्ट्राँग रुम म्हणतात. स्ट्राँग रुममध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची निगराणी तसेच स्ट्राँग रुमला कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात असते. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांनी ट्विट करत खळबळजनक आरोप केला आहे.