चड्डी-बनियानमध्ये विमानात घुसल्याने अर्शद वारसीला जया बच्चन यांनी झापले तेव्हा……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | FILMMAKING | BOLLYWOOD | ARSHAD WARSI | JAYA BACHCHAN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बॉलीवूडचे कलाकार हे सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे, कधी त्यांच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. आता बॉलीवूड अभिनेता अर्शद वारसीने जया बच्चन यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगितल्याने चर्चेत आला आहे. अर्शद वारसीने ‘अनफ़िल्टर्ड बाय समदीश’ या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी त्याने ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान कपडे व्यवस्थित न घातल्यामुळे जया बच्चन यांनी त्याला झापल्याची आठवण त्याने सांगितली आहे. ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटाची निर्मिती अमिताभ बच्चन यांनी केली आहे.
(संग्रहित दृश्य.)
चड्डी- बनियान अशा कपड्यांमध्ये विमानात बसलो.
अर्शद वारसी महाला कि चित्रपटसृष्टीत मी त्यावेळी नवीन आलो होतो आणि माझे ज्ञान फारच कमी होते. मी एका वेगळ्याच दुनियेतून आलो होतो. ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटासाठी आम्ही हैदराबादला शूटिंगसाठी गेलो होतो. त्यावेळी मी चड्डी- बनियान अशा कपड्यांमध्ये विमानात बसलो. आधीपण आम्ही असेच फिरायचो, डान्स करायचो. जेव्हा जयाजींना ही गोष्ट माहित झाली तेव्हा लगेच त्यांचा मेसेज आला की मिस्टर वारसींनी कृपया हे कळवा की जेव्हा ते प्रवास करतील त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत. आणखी एक किस्सा सांगताना वारसींनी म्हटले की, जेव्हा जया बच्चन यांनी मला चित्रपटाच्या प्रिमिअरला बोलवले होते त्यावेळी त्याने अमिताभ बच्चन यांच्यासमोरच स्पष्टपणे चित्रपट निरस असल्याचे म्हटले होते. त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी त्याला सांगितले की त्याने त्याची मत अशाच प्रकारे स्पष्टपणे मांडले पाहिजे.