TIMES OF AHMEDNAGAR
साडीचा गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
अल्पवयीन मुलीची छेडछाड व तीने आत्महत्या केल्याप्रकरणी आरोपी शरद हनुमंत ढाळे व महादेव विष्णु ढाळे दोघे. रा. तेलंगशी ता. जामखेड आशा दोघांवर जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांन कडून मिळालेली माहिती अशी की मयत अल्पवयीन मुलगी ही तीच्या तेलंगशी येथील मामाकडे शिक्षणासाठी रहात होती तर तीचे माध्यमिक शिक्षण खर्डा याठिकाणी झाले आहे. तिने इयत्ता १२ वी ची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मामाकडे शिक्षण घेत आसतानाच तेलंगशी गावातील आरोपी शरद हनुमंत ढाळे हा तीला वेळोवेळी त्रास देऊन छेडछाछ करीत होता. तर त्याचा चुलत भाऊ महादेव विष्णु ढाळे हा मुलीला पळवुन घेऊन जा आसे सांगत होता. तिच्या वडिलांना हे सर्व प्रकरण कळताच त्यांनी तिला तिच्या मोठ्या बहिणीकडे म्हणजे पुण्याला पाठवले होते पण आरोपी असलेले शरद ढाळे व महादेव ढाळे हे दोघेही पुणे येथे जाऊन त्या मुलीला त्रास देऊ लागले या सर्व घटनांना त्रासून त्या अल्पवयीन मुलीने पुण्यात असलेल्या तिच्या बहिणीच्या घरी साडीचा गळफास घेऊन आत्महत्त्या केली.
स्त्रोत.सोशल मिडिया
मयत झालेल्या मुलीने लिहून ठेवली होती चिट्ठी…
मयत मुलीच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीनुसार काही दिवसांपूर्वी मयत झालेली मुलगी हिने एक चिट्ठी लिहून ठेवली होती त्यात या दोन्ही आरोपींचे नाव असलेले स्पष्ट झाले आहे. यावरून जामखेड पोलिसांनी शरद ढाळे व महादेव ढाळे या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.आत्महत्त्या केलेल्या मुलीला तिच्या राहत्या घरी म्हणजेच जामखेड या ठिकाणी शवविच्छेदनासाठी नेण्यात आले आहे.