TIMES OF AHMEDNAGAR
देशभरात लोकसभा निवडणुकींच्या वातावरणाने सर्वसामान्यांच्या चर्चेत राजकारणाचा तडका लावला आहे. महाराष्ट्रात देखील मतदान झाले असून आता कोणत्या मतदार संघातून कोण निवडून येणार आणि कोण खासदार होणार याची सध्या उत्सुकता लागली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीत कोण जिंकणार ? यावरुन झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपुरमध्ये घडली आहे. नागपुरच्या नरखेड तालुक्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. ही घटना नरखेड तालुक्यातील सिंगारखेडा गावात घडली आहे. रामटेक लोकसभा मतदार संघात येणाऱ्या या गावात लोकसभा निवडणुकांच्या निकालावरुन जोरदार राडा झाला. यावेळी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. या खळबळजनक घटनेने नागपूर जिल्हा हादरुन गेला आहे.


