अवैध धंद्यांवर वाजतंय गीत, संभ्या , कमल्याच्या खांद्यावर आर्थिक फीत…..?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | NASHIK REGION | INSPECTOR GENERAL OF POLICE, NASHIK REGION | AHMEDNAGAR DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | DEPUTY SUPERINTENDENT OF POLICE RURAL | TALUKA POLICE STATION | TALUKA POLICE STATION POLICE INSPECTOR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – एस.बी.आय चौकात एक इसम अवैध दारू विक्री करत होता. एस.बी.आय चौकातील साई श्रद्धा हॉटेलच्या आडोशाला विनापरवाना देशी व विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती गुप्तदाराने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आणि त्याच्यावर गुन्हा नोंद केला. भिंगार पोलीस ठाण्याचे पथक अवैध धंद्यांवर छापे टाकत आहेत. मात्र भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तालुका पोलीस ठाण्याचे पथक गीत गात बसले आहे का असा सवाल सध्या चर्चा रंगवत आहे.
कारवाई नाही , कशापाई ?
तालुका पोलीस ठाण्याची हद्द शहराच्या बोर्डरवर असल्याने तालुका हद्दीत अवैध धंद्यांचा चाललेला भोंगळा कारभार शहरात पोहचत नाही या भ्रमापोटी प्रशासन असेल. म्हणूनच कदाचित प्रशासन गाण्यांचे गित ऐकत झोपले असावे. तालुका हद्दीतील शिराढोण सारख्या गावातील एका नदीत मोठ्या प्रमाणात देशी विदेशी दारूची विक्री केली जाते, मद्यपेयी येथे मद्याचे सेवन करून नशेत येऊन बिंनधास्तपणे समाजिक शांतता भंग करत आहेत, अरणगाव येथील वेश्याव्यवसाय व दारूच्या धंद्यांना कोण पाथरुड घालत आहे हे देखील प्रशासनाने शोधले पाहिजे, रुईछत्तीस, कवडगाव येथे प्रशासनाने छापे टाकून कारवाई करण्याची हिम्मत दाखवणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी टाईम्स ऑफ अहमदनगर शी खासगीत बोलतांना सांगितले.
पोलीस निरीक्षक साहेब कधी करणार कारवीची घाई ?
अवैध धंद्यांमुळे अनेक सर्वसामान्य नागरिकांचे जगणे कठीण झाले आहे. अवैध गुटखा विक्रीमुळे तरुणांना कॅन्सर सारख्या भयंकर आजाराचचे शिकार व्हावे लागत आहे. सुगंधित तंबाकूची विक्रीची मोठी स्पर्धा सध्या तालुका हद्दीतील अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांमध्ये लागली आहे. या सर्व अवैध धंद्यांना सध्या सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. तरी या धंद्यांवर कधी कारवाई होणार हा सवाल उपस्थित केला जात आहे.
संभाच्या आर्थिक खंब्याचे हित,कमल्या गातो धंद्यांचे गीत…..
तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्यांचे प्रमाण काही कमी नाही. मध्यरात्री चोरांचा सुळसुळाट तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे. चोरी करून चोरलेले सामान भंगारच्या दुकानात हे चोरटे विक्री करतात. मात्र पोलीस प्रशासनाकडून कानडोळा केला जातो. दिवसाढवळ्या गाड्या चोरीला जाणे , मध्यरात्री घरफोडी होणे हि बाब अत्यंत गंभीर आहे. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे देखील काही नवीन नाही. सर्रासपणे अवैध गुटखा विक्री , सुगंधित तंबाखू विक्री , बेकायदेशीरपणे दारू विक्री हे प्रकार सुरु आहेत. मात्र प्रशासनाकडून या अवैध धंद्यांची कोणत्याही प्रकारे गंभीर दाखल घेतली जात नाही. कारण अवैध धंद्यांना कमल्या नामक एक इसम मदत करत आहे, तर संभा नामक एक इसम आर्थिक खंबा घेत आहे हे दोन कलाकार कोण आहेत हे देखील पोलिसांनी शोधणे गरजेचे असल्याचे नागरिकांनी व्यक्त केले आहे.