बेशिस्त सॅम …! बहाद्दूर झाला …!
नुकताच प्रदर्शित झालेला दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहाद्दूर या सिनेमाने भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ यांची प्रेरणादायी जीवनगाथा ‘सॅम बहादूर’ या सिनेमातून पडद्यावर मांडली आहे. अभिनेता विकी कौशल यानं सॅम माणेकशॉ यांचं व्यक्तिमत्त्व आत्मसात करत आपण एक उत्तम कलाकार असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. ‘एक सोल्जर के लिए उसकी जान से ज्यादा किमती होती है उसकी इज्जत, उसकी वर्दी, एक सोल्जर अपनी वर्दी की इज्जत के लिए अपनी जान दे भी सकता है.. मगर जवानों की ड्यूटी है देश की रक्षा के लिए दुश्मन की जान लेना!’ हा संवाद म्हणताना विकी कौशलच्या चेहऱ्यावरील भाव, त्याची देहबोली, नजरेतील भेदकता आणि आवाजातील आक्रोश हे सगळं प्रेक्षकांना जणू खऱ्या सॅम माणेकशॉ यांच्यासमोर नेऊन उभं करतं. इतक्या ‘कन्व्हिक्शन’ने विकीनं ती व्यक्तिरेखा साकारली आहे. सॅम बहाद्दूर या सिनेमातील टीम ने या सिनेमासाठी व्यक्तिरेखांवर घेतलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. साहजिकच दिग्दर्शक म्हणून मेघनाचं योगदानही मोठं आहे. माणेकशॉ प्रेक्षकांना प्रभावीरित्या पडद्यावर दिसतात.
कोण होते फील्ड मार्शल सॅम माणेकशाॅ ?
पिळदार मिशावाल्या फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, जे प्रत्येक बाबतीत प्रत्येकाला चोख प्रत्युत्तर देत असतं. त्यांना जवळून ओळखणारा एक माणूस सांगतो, की सॅम मानेकशॉ हे पक्के लष्करी अधिकारी होते. फील्ड मार्शल सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशाॅ भारतीय सैन्याचे सरसेनापती होते. मानेकशॉ भारताचे आठवे सैन्यप्रमुख होते.
प्रथम महिला पंत्रप्रधान यांना स्वीटी म्हणणे,हा बेशिस्त पणा ?
सॅम मानेकशॉ हे अत्यंत जबाबदार व शिस्तप्रिय होते असे काही जाणकार सांगतात,मग दिग्दर्शकांनी त्यांना एका महिला पंतप्रधानांसमोर असं बेशिस्त का दाखवले असेल ? महिला पंतप्रधानांना स्वीटी म्हणणे,त्यांचे न ऐकताच आपला निर्णय जाहीर करणे असे कृत्य दाखवून दिग्दर्शकांनी सॅम मानेकशॉ यांची प्रतिमा मळीण करण्याचा प्रयत्न केला असल्याची चर्चा वेग घेत आहे. मेघना गुलजार यांनी अत्यंत सुंदर पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली पण महिलेचा अभिमान व स्वाभिमान हा महत्वाचा असतो हे कदाचित निर्मात्यांच्या लक्षातून राहून गेले असावे अशी खंत प्रेक्षक व्यक्त करतात.विकी कौशल याला तत्कालीन पंतप्रधान इंदीरा गांधी यांच्यावर वरचढ दाखवण्याचा प्रयत केला गेला असल्याचे देखील प्रेक्षक सांगतात.महिला पंतप्रधानांना थेट स्वीटी म्हणणे आणि पंतप्रधानांपेक्षा विकी कौशल हा जास्त प्रभावशाली दाखवण्याचा निर्माते व दिग्दर्शकांचा प्रयत्न का होता हे अद्यापही स्पष्ट झाले नाही.
पंतप्रधान मोदी यांच्यावर टीकेमुळे राहुल गांधींची खासदारकी रद्द झाली होती.
राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी भाजपवर टीका करताना मोदी या आडनावावरुन टिप्पणी केली होती. सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे ? मग ते ललित मोदी असो वा नीरव मोदी वा नरेंद्र मोदी, असेही त्यांनी म्हटले होते. राहुल गांधींच्या विरोधात सुरत न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात निकाल देताना सुरत जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी राहुल गांधी यांना दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली होती.आणि राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात अली होती.
प्रेक्षकांचे मत काय …..? संताप कशावरून आणि का …..?
‘सॅम बहादूर’ सिनेमामध्ये विकी कौशल तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सरळ स्वीटी या नावाने उद्गारतो. लष्कराचे नेतृत्व करणाऱ्या व लष्कराला शिस्त लावणाऱ्या सॅम मानेकशॉ यांना देशाच्या पंतप्रधानांशी कसे बोलावे याचे ज्ञान नव्हते का ? एकीकडे विकी कौशल आपल्या सैन्याला सूचना देतांना सांगतो कि महिलांचा आदर करा आणि दुसरीकडे देशाचे नेतृत्व करणाऱ्या महिला पंतप्रधानांविषवि त्याच्या मनात थोडा सुद्धा आदर बघायला दिसला नाही याची खंत वाटतअसल्याचे प्रेक्षक दबक्या आवाजात सांगतात.ज्या पंतप्रधांनांना विकी कौशल स्वीटी म्हणतो त्याच पंतप्रधानांच्या नातुने आजच्या पंतप्रधानांच्या विषय चोर हा शब्द वापरल्याने त्यांची खासदारकी रद्द करण्यात अली होती.
पण प्रश्न पडतो कि विकी ने केलेले ते पात्र खरंच बेशिस्त होत का ?
मेघना गुलजार दिग्दर्शित सॅम बहाद्दूर या सिनेमात सॅम होर्मसजी फ्रामजी जमशेदजी माणेकशॉ यांची जीवनगाथा मांडण्याचा प्रयत्न झाला खरा,देशामध्ये मानेकशॉ या नावाच्या व्यक्तीचे महत्व आहे व या रूपाने प्रेक्षकांना काही तरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकांनी केला त्या बद्दल प्रेक्षकांनी तोंडभरून मेघना गुलजार,विकी कौशल व आदी कलाकारांचे कौतुक केले खरे. पण महिला पंतप्रधानांना थेट स्वीटी म्हणणे व त्यांच्याशी वागण्याच्या अंदाजावरून प्रेक्षकांनी तेवढ्याच अधिकाराने संतापही व्यक्त केला आहे.
पात्र देखील फसले ? सॅम बहाद्दूर या सिनेमात दाखवण्यात आलेल्या इंदिरा गांधी व जवाहरलाल नेहरू यांच्या व्यक्तिरेखा दिग्दर्शकांना व्यवस्थित मांडता आल्या नाहीत.अमीर खानची मुख्य भूमिका असलेला दंगल या सिनेमात प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या फातिमा शेख हिने सॅम बहाद्दूर या सिनेमात इंदीरा गांधी यांची भूमिका केला आहे. परंतु भूमिका साकारत असतांना एका मोठ्या नेत्याची व माजी पंतप्रधानांची भूमिका आपण अभ्यास पूर्वक साकारली पाहिजे याची कदाचित कल्पना नसावी.