By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: ४ वर्षीय मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या ; अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > ४ वर्षीय मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या ; अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक….
क्राईम न्यूज

४ वर्षीय मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या ; अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक….

Last updated: 2025/03/27 at 12:10 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE
TIMES OF NAGAR 

मुंबई : कांदिवलीत ४ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीला कांदिवली पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मृत मुलाच्या सावत्र वडिलांचा मित्र आहे. सीसीटीव्ही चित्रिकरणामुळे त्याची ओळख पटली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. एक संशयित सायकलवरून दि. २२ मार्च रोजी आला आणि झोपलेल्या बालकाचे अपहरण केले. त्यानंतर निर्दयपणे त्याची हत्या केली. गुन्हा केल्यानंतर आरोपी घटनास्थळी परत आला आणि मुलाचा मृतदेह कुटुंबीय झोपलेल्या ठिकाणापासून अवघ्या ३० मीटर अंतरावर टाकून पळून गेला. सुरूवातीला मुलाचे कपडे भिजले असल्यामुळे त्याचा पाण्यात बुडवून मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. पण मुलाच्या गळ्यावर व्रण असल्यामुळे त्याचा गळा आवळून ठार मारल्याचे पोलिसांनी सांगितले. अक्षय गरूड असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने मुलाचे अपहरण व हत्या का केली याचे नेमके कारण सांगितलेले नाही. त्याबाबत त्याची चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. सीसीटीव्ही चित्रीकरणात संशयित कैद पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. अखेर मंगळवारी (दि.२५)  आरोपीला अटक करण्यात आली. मृत मुलगा कांदिवली पूर्व येथील आपल्या पालकांसोबत राहत होता. घटनेच्या एक दिवस आधी तो आपल्या आजीला भेटण्यासाठी कांदिवली पश्चिम इराणीवाडी येथे आला होता त्याची आजी पदपथावर राहात असून अपहरणाच्या वेळी तीही त्याच्यासह होती. रात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपी सायकलवरून आला आणि झोपलेल्या मुलाला उचलून घेऊन गेला. सुमारे अर्ध्या तासाने आरोपीने मुलाचा मृतदेह एका बांधकामाच्या ठिकाणी टाकला आणि तो फरार झाला. आरोपी मृत मुलाच्या सावत्र वडिलांचा मित्र असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article सकाळी प्रेयसीसोबत कोर्ट मॅरेज, तर रात्री कुटुंबाने ठरवलेल्या मुलीशी लग्न…
Next Article देशमुखांचा खून आम्हीच केला ; वाल्मीक कराडच्या चेल्यांची कबुली तर कराडच्या आडचणी वाढणार…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?