TIMES OF AHMEDNAGAR
पतीने गाणे ऐकण्यासाठी फोन मागितला,पत्नीने त्याचा डोळाच कापला.
एका शुल्लक कारणावरुन बायकोने कात्रीने हल्ला करत नवऱ्याच्या डोळ्याला इजा पोहोचवली आहे. नवरा या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवऱ्याने बायकोकडे गाणी ऐकण्यासाठी मोबाईल मागितला होता. यावरुन झालेल्या वादानंतर ही घटना घडली आहे. उत्तर प्रदेशमध्ये बागपत जिल्ह्यात ही घटना घडली आहे. प्रियंका असे पत्नीचे नाव आहे. तर अंकित असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे.


