राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल संजय राउत यांनी व्यक्त केले मोठे विधान.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | RAJ THACKERAY | UDDHAV THACKERAY | SANJAY RAUT | AMIT SHAH | LOK SABHA ELECTION | WILL RAJ THACKERAY AND UDDHAV THACKERAY GET TOGETHER ? | SANJAY RAUT SPOKE CLEARLY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत. अशातच भाजपाने जोरदार तयारी सुरु केली आहे. अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. महायुतीच्या जागावाटपाचंही ठरलं आहे अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. दुसरीकडे विरोधकांनी म्हणजेच महाविकास आघाडीनेही कंबर कसली आहे. राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका अजून स्पष्ट केलेली नाही. मात्र ते महायुतीबाबत जाऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊ शकतात का ? या प्रश्नाचं उत्तर दिले आहे.राज ठाकरेंनी जेव्हापासून शिवसेना सोडली आहे तेव्हापासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे अशी भावना मराठी माणसांच्या मनात आहे. अशात खासदार संजय राऊत यांचे राज ठाकरेंशी मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्याच अनुषंगाने संजय राऊत यांना जेव्हा विचारण्यात आलं की सध्या ज्या प्रकारचं राजकारण सुरु आहे ते पाहता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ? त्यावर संजय राऊत यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
महाराष्ट्र आणि मराठी यांच्यात फूट असता कामा नये.
राज ठाकरेंनी त्यांचा मार्ग त्यांनीच निवडला. राज ठाकरेंना कुणीही जा सांगितलं नाही. एखाद्या घरात चार मुलं असतील तर ती त्यांच्या मार्गाने जातात. कुणी आई वडिलांना सोडून अमेरिकेला जातो. कुणी आणखी काही भूमिका घेतात. समाजात या गोष्टी घडतात. राज ठाकरे हे माझे अजूनही मित्र आहेत. महाराष्ट्र, मराठी यांच्यात फूट असता कामा नये हे तर माझ्यासारख्या माणसाला वाटणारच. एखादा मार्ग एखाद्या सज्ञान व्यक्तीने निवडला आहे. याचा अर्थ त्याला आपलं भवितव्य कळतं. वेगळे जरी झालो तरीही कटुता असता कामा नये असं आम्ही मानतो आणि ती कटुता आमच्यात नाही. राजकीय मार्ग वेगळे असू शकतात. एकाच घरात चार पक्षाचे लोक आम्ही पाहिले आहेत. आपणही पाहतो. इसापनिती या यु टूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत संजय राऊत यांनी हे उत्तर दिले आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया
आम्ही लढत आहोत.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का ? असा प्रश्न विचारला असता संजय राऊत म्हणाले, ती वेळ आता निघून गेली. राज ठाकरेंनी पक्ष स्थापन करुन २५ वर्षे झाली. बाळासाहेब असताना वाटायचं सगळ्यांना की जे काही झाले ते बरोबर झाले नाही. पण आत्मपरीक्षण केलं त्यांच्या लोकांनी तर त्यांनी काय मिळवलं ? शिवसेनेचे तुकडे होऊनही आहे तिथेच आहेत. आजही आमचा पक्ष कुणाच्या तरी ताब्यात दिला गेला आहे. पण आम्ही आहोत ना.. आम्ही लढत आहोत. आम्ही पक्ष उभा करत आहोत, अविश्रांत मेहनत घेत आहोत. निवडणुका घेण्याची हिंमत दाखवा हे आम्ही सांगत आहोत. राज ठाकरेंना काय राजकीय फायदा झाला ? तर काही नाही. त्यांनी आता आत्मचिंतन केलं पाहिजे. राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही भावना मराठी माणसाच्या मनात नक्कीच आहे. महाराष्ट्राच्या कुंडलीत जे आहे ते घडेल.