नागपूर : पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींनी वारंवार त्रास दिल्याने विधवा महिला हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला गेली असता पोलीस ठाण्यातच तिला एक इसम भेटला या भेटलेल्या युवकाने तिला मदत करण्याचा बहाणा करुन प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर अविवाहित असल्याचे सांगून लग्नाचे आमिष देऊन तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी संबंधित महिलेच्या त्या युवकाच्या तक्रारीवरुन बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. वसीम सैयद (४५ रा. ताजनगर, तुकडोजी पुतळा चौक) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिला पूजा (बदललेले नाव) हिचे २०२४ मध्ये अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रमणीनगरात राहणाऱ्या युवकाशी लग्न झाले होते. तिचा पती खासगी काम करीत होता. आईवडिलांशी पटत नसल्यामुळे पती-पत्नीने मेहनत करुन बाहादुरा परीसरात घर बांधले. त्यांना एक मुलगा व मुलगी झाली. सुखाने संसार सुरु असतानाच पतीचा ब्रेन हँमरेज मुळे मृत्यू झाला होता. त्यावेळी सासरी असलेली वडिलोपार्जीत संपत्तीवरील हक्क सोडण्यासाठी सासरची मंडळी घरी येऊन वाद घालायची. अनेकदा पुजाला सासरच्या मंडळीने मारहाण केली. सासरच्या जाचाला कंटाळूून ती आत्याला सोबत घेऊन हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेली. हुडकेश्वर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि गुन्हा दाखल केला.
(संग्रहित दृश्य.)
३ वर्षांपासून पूजाचे लैंगिक शोषण….
यादरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थित असलेला आरोपी वसीम सैयद (वय ४५) याने पुजाशी ओळख केली. तिला पोलीस ठाण्याच्या कामात मदत करण्याचे आमिष दाखवले. तसेच सासरकडून मिळालेल्या घराचा सौदा करुन विक्री करुन देण्याचा विश्वास दर्शविला. त्या माध्यमातून वसीम आणि पूजा यांचे नेहमी फोनवरुन बोलणे व्हायचे. पूजा ही दोन मुलांसह एकटीच राहत असल्याचे वसीमने हेरले. त्याने पुजला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला अविवाहित असल्याचे सांगितले. दोन्ही मुलांचा सांभाळ करुन लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यावर ती भाळली वसीमने तिच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केला. गेल्या ३ वर्षांपासून पूजाचे लैंगिक शोषण करणे सुरु केले. वसीमने पूजाचे ९ लाख रुपयांत घर विकले आणि ७ लाख रुपयांत एक भूखंड विकला. अशाप्रकारे १६ लाख रुपये घेऊन वसीमने पुजाची फसवणूक केली. पूजा आणि वसीमने हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाडोत्री खोली करुन लिव्ह अँड रिलेशनशिपमध्ये राहायला लागले. पूजाने वसीमला वारंवार लग्नासाठी तगादा लावला. त्याने प्रत्येकवेळी काहीतरी कारण सांगून टाळाटाळ केली. तसेच तो आठवड्यातून फक्त दोनच दिवस घरी यायला लागला. त्यामुळे पुजाला संशय आला. तिने वसीमवर नजर ठेवून त्याचे घर गाठले. घरात त्याची पत्नी आणि पाच मुले दिसून आली. प्रियकर विवाहित असल्याची माहिती मिळताच दोघांमध्ये वाद झाला.