By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: मैत्रिणीला बघण्यासाठी वकिलाच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर वकिलानेच केला बलात्कार…….
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > मैत्रिणीला बघण्यासाठी वकिलाच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर वकिलानेच केला बलात्कार…….
क्राईम न्यूज

मैत्रिणीला बघण्यासाठी वकिलाच्या घरी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर वकिलानेच केला बलात्कार…….

Last updated: 2025/03/04 at 5:06 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIEMS OF NAGAR 

भंडारा : शेजार धर्माला काळिमा फासणारी संतापजनक घटना काल सोमवार (दि.३ मार्च) रात्री शहरातील एका सोसायटीत घडली आहे. एका वकिलाने त्याच्या मुलीला खेळायला बोलवायला आलेल्या शेजारच्या एका ११ वर्षीय मुलीला खोटे बोलून घरात घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला असल्याची संतापजनक घटना घडली आहे. त्याप्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात लैंगिक अत्याचारासह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करत पोलिसांनी नराधमाला तासाभरातच बेड्या ठोकल्यात. विजय रेहपाडे असे अटक करण्यात आलेल्या नराधमाचे नाव असून तो व्यवसायाने वकील आहे. पीडितेच्या आईंच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पिडीत हि आई आणि १३ वर्षीय भावासोबत राहते. पीडित मुलीचे वडील शासकीय नोकरीत असून ते नोकरीनिमित्त दुसऱ्या ठिकाणी राहतात. पीडिता आणि आरोपी विजय रेहपाडे याची मुलगी समवयस्क असल्याने दोघींमध्ये मैत्री झाली. मागील काही महिन्यांपासून दोघींचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे होते. दोघीही सोसायटीच्या परीसरात सोबत खेळत असतात घटनेच्या दिवशी दिनांक ३ मार्च रोजी पीडिता रोजच्याप्रमाणे सायंकाळच्या सुमारास सोसायटी परिसरात खेळण्याकरीता गेली. मात्र अर्धा तासातच ती घरी रडत रडत परत आली. त्यावेळी आईने ती का रडत आहे ?  असे विचारले. मात्र तिचे रडणे थांबत नसल्याने आईने तिला बेडरुममध्ये नेले आणि रडण्याचे कारण विचारले. त्यावेळी पीडित अल्पवयीन मुलीने आईला आपबिती सांगितली.

राज्यात महिला अत्याचाराचे ३० हजार गुन्हे(संग्रहित दृश्य.)

मुलीने घडलेली घटना आईला सांगितली….

पीडित मुलीने आईला सांगितले की ती खेळण्याकरीता सोसायटी परिसरात गेली मात्र तिथे तिला तिची मैत्रीण दिसली नाही. त्यामुळे ती तिच्या मैत्रिणीला बोलाविण्याकरीता घरी गेली. त्यावेळी फ्लॅटचे दार मैत्रिणीचे वडील आरोपी विजय रेहपाडे याने उघडले. पीडीतेने तिची मैत्रीण घरी आहे का ? अशी विचारणा केली असता आरोपी विजय रेडपाडे याने घरात खेळत आहे. असे खोटे बोलून पीडित मुलीला घरात घेतले आणि बेडरुममध्ये जाण्यास सांगितले. त्यानंतर घरी कुणीही नसल्याचा फायदा घेत विजय रेडपाडे या नराधमाने त्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केला. तिने त्याला प्रतिरोध केला मात्र वासनांध नराधमाने तिला सोडले नाही. अखेर तिने त्याच्या तावडीतून कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. त्यानंतर ती रडत रडत घरी आली आणि आईला रेहपाडे याने केलेल्या दुष्कृत्याचे कथन केले. आईने ताबडतोब पोलीस ठाणे गाठले आणि विजय रेहपाडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली असून वकिली पेशाला काळिमा फासणाऱ्या या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad1
Happy0
Sleepy0
Angry1
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article दोघांना एकमेकांवर प्रेम झाले,दोघे सोबत राहिले अन प्रियकर अचानक निघाला पाच मुलांचा बाप….तिने थेट दाखल केला बलात्काराचा गुन्हा ?
Next Article आमदार जितेंद्र आव्हाडांचा संताप ; दगड घेऊन घुसले विधीमंडळ परिसरात…..
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?