Nagpur Clash Live Updates: Prohibitory Orders Imposed, CM Fadnavis Says 'Don't Believe Any Rumours' - News18(संग्रहित दृश्य.)

वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड…

काही समाजकंटकांनी पोलिसांविरुद्ध निदर्शने करीत रस्त्यावरी वाहनांची तोडफोड केली. ई रिक्षा आणि ऑटो रस्त्यावर उलटवून रस्ता बंद करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावर उभ्या दुचाकींचीसुद्धा तोडफोड केली. यामध्ये सर्वाधिक नुकसान ई रिक्षाचे झाले आहे. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला असून पोलीस आयुक्त,सहआयुक्तांसह सर्वच अधिकारी महालमध्ये दाखल होऊन परिस्थितीवर नियंत्रण मिळ‌विण्याचा प्रयत्न करीत आहेत. काल सायंकाळी ७ ते ७.३० दरम्यान शिवाजी चौकाजवळ एका गटाने घोषणाबाजी सुरू केली. यामध्ये त्यांचा दुपारी विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनासंदर्भात त्यांचा रोष होता. घोषणाबाजी सुरू होताच परिसरातील दुसऱ्या गटानेही घोषणाबाजीला सुरुवात केल्याने वाद वाढला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घोषणाबाजी करणाऱ्या दोन्ही गटांना पांगवले. मात्र पुढे चिटणीस पार्कच्याकडील भालदारपुरा दिशेने पोलिसांवर दगडफेक सुरु झाली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.