(संग्रहित दृश्य.)
आरोपींची चौकशी…
आरोपी पळून गेल्यानंतर गीताच्या सुनेने स्व:तची सुटका केली नंतर सासुलाही सोडविले. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. सासू सुनेची आस्थेनी विचारपूस केली. गीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. माहिती मिळताच पोलीस उपायुक्त निकेतन कदम कळमना ठाण्यात पोहोचले. त्यांच्या मार्गदर्शनात पोलीस पथकाने जवळपासचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपीचे वाहन सीसीटीव्ही कैद झाले होते. वाहनाच्या नंबरवरून तीन तासात शोध घेतला. सखोल चौकशी करून त्यांच्याकडू ३ लाख रोख, सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले. घटनेमुळे गीताचे पती आणि मुलगा यांना धक्का बसला असून ते चिंतेत आहेत. पोलिसांनी वाहनाच्या नंबरवरून जबरीने चोरीसाठी आलेल्या दोघांना तीन तासात सापडून काढले. सखोल चौकशीत या प्रकरणाची मुख्य सुत्रधार गीताची सून असल्याचे आरोपीने पोलिसांना सांगितले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी तिने स्व:तलाही बांधून ठेवल्याचा बनाव केला. सून आणि तिचा मित्र यांनी मिळून चोरीचा कट रचला. हा संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर सासूच्या पाया खालची जमीनच सरकली.