आज बारामतीमध्ये पाडव्याचा सण जोरदार साजरा करण्यात येत आहे. ५० वर्षांमध्ये पहिल्यांदाच पवार कुटुंबात दोन दिवाळी पाडव्याचे सण साजरे होत आहेत. शरद पवार यांचा गोविंदबाग या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा होत आहे, तिथे ते कार्यकर्त्यांना भेटत आहेत. अजित पवार यांनी पहिल्यांदाच काठेवाडी येथे दिवाळी पाडव्याचे आयोजन केले आहे. सकाळी सात वाजता अजित पवार, सुनेत्रा पवार काठेवाडी येथे दिवाळी पाडव्यासाठी दाखल झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे दिसले. अजित पवार, सुनेत्रा पवार यांच्यासोबत, मुलगा पार्थ आणि जय हेही उपस्थित होते. यावेळी अजित पवारांना भेटण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांने दादांचं तोंड गोड करण्यासाठी सोन्याची मिठाई आणली आहे.अजित पवारांसाठी आणलेल्या या सोन्याच्या मिठाईची जोरदार चर्चा सुरू आहे, अजित पवारांसाठी ही मिठाई बनवण्यात आली आहे. तर काही कार्यकर्ते गेली अनेक वर्ष पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी बारामतीमध्ये येतात. अशाच एका कुटुंबातील तिन्ही पिढ्या एकत्र अजित पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आल्यात आहेत. यावेळी आम्ही अजितदादांसोबतच आहोत असा विश्वास दर्शवत कार्यकर्त्यांनी समर्थन दिलं आहे.
(संग्रहित दृश्य.)
यामध्ये ९९ टक्के सोन्याचा अर्क…
सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली आहे. यामध्ये ९९ टक्के सोन्याचा अर्क आहे, अजित पवारांसाठी ही मिठाई बनवली आहे, एक आठवडा ही मिठाई बनवण्यात आली आहे. चितळे बंधु यांच्याकडून ही मिठाई तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती यावेळी या कार्यकर्त्यांने दिली.अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी झाल्यानंतर बारामतीमध्ये पहिल्यांदाच अजित पवार यांच्याकडून वेगळा दिवाळी पाडवा साजरा करण्यात येत आहे. आज सकाळपासून कार्यकर्ते, पदाधिकारी अजित पवार यांना शुभेच्छा देण्यासाठी काटेवाडीत पोहोचले आहेत. अजित पवार यांना भेटण्यासाठी आलेल्या आबा काळे यांनी सर्वांचे लक्ष वेधळे. त्यांनी दादांसाठी स्पेशल बनवून सोन्यासारख्या माणसाला सोन्याची मिठाई आणली. याची काठेवाडीत चर्चा सुरु आहे.