Reading:ठरल्याप्रमाणे मी तिथे पोहचले अन् त्या दिग्दर्शकाने मला थेट कपडे काढ आणि इनरवेअरमध्ये माझ्यासमोर येऊन बस अशी मागणी केली, त्या अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ…..
ठरल्याप्रमाणे मी तिथे पोहचले अन् त्या दिग्दर्शकाने मला थेट कपडे काढ आणि इनरवेअरमध्ये माझ्यासमोर येऊन बस अशी मागणी केली, त्या अभिनेत्रीच्या वक्तव्याने खळबळ…..
बॉलीवूडमध्ये कधी काय घडेल याची भविष्यवाणी करणे हे कोणत्याही तज्ञाला जमले नाही,कारण बॉलीवूड एखाद्याला अर्ध्यारात्री स्टार बनवतो तर एक रात्रीत एखाद्याचे जीवन संपवतो हे जगजाहीर आहे. कित्येक बॉलिवूड सौंदर्यवतींनी कास्टिंग काऊचबाबत उघडपणे भाष्य करुन ग्लॅमरस दिसणाऱ्या बॉलिवूडची काळी बाजू सर्वांसमोर मांडली आहे. अनेक अभिनेत्रींनी त्यांच्यासोबत घडलेल्या नको त्या प्रसंगाबाबत सर्वांसमोर थेट खुलासा करुन इंडस्ट्री हादरवून टाकली आहे. आता असाच एक खुलासा अभिनेत्री नवीना बोले हिने केला आहे तिच्या या वक्तव्याने सध्या अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवीना बोले हिने थेट बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, आरोपांनंतर नवीनान म्हटलंय की, तिला पुन्हा कधीच या दिग्दर्शकाला भेटायचं नाही. अनेक सिनेमे आणि टीव्ही शोमध्ये काम करणारी अभिनेत्री नवीना बोले हिनं प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर कास्टिंग काऊचचा आरोप केला आहे. सुभोजित घोषच्या यूट्यूब चॅनलला अलिकडेच दिलेल्या मुलाखतीबाबत बोलताना नवीना बोले हिनं अनेक गोष्टींवर उघडपणे भाष्य केलं. नवीना बोलेनं खुलासा केलाय की, काही वर्षांपूर्वी साजिद खाननं तिच्याकडून एक अतिशय घाणेरडी मागणी केली होती.
(स्त्रोत.सोशल मिडिया.)
ठरल्याप्रमाणे मी त्यानं सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले.
साजिद खाननं मला घरी बोलावलं आणि चुकीच्या मागण्या केल्या. असं नवीना बोले हिनं म्हटलं आहे. साजिद खान त्यावेळी ‘हे बेबी’ सिनेमासाठी कास्टिंग करत होता. त्यावेळी त्यानं मलाही ऑडिशन देण्यासाठी बोलावून घेतलं. ठरल्याप्रमाणे मी त्यानं सांगितलेल्या ठिकाणी पोहोचले. त्यानं सर्वात आधी मला माझे कपडे काढून इनरवेअर्सवर बसायला सांगितलं. त्यावेळी त्यानं सांगितलं की, मला तू किती कंफर्टेबल आहेस ? हे पाहायचं आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्रीनं केलेल्या धक्कादायक आरोपांमुळे इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. दरम्यान, अभिनेत्री नवीना बोले ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘सीआयडी’ सारख्या शोमध्ये दिसून आली होती.
(स्त्रोत.सोशल मिडिया.)
बिकिनी घालावी लागेल,आणि मी आत्ता माझे कपडे…….
नवीना बोले म्हणाली की, ‘एक खूप भयानक माणूस आहे, ज्याला मी माझ्या आयुष्यात कधीही भेटू इच्छित नाही, त्याचं नाव साजिद खान आहे. महिलांचा अनादर करण्याच्या बाबतीत त्यानं खरोखरच मर्यादा ओलांडल्या आहेत. जेव्हा त्यानं मला फोन केला, तेव्हा मी खूप आनंदात होते. मी ठरल्याप्रमाणे तिथे गेले आणि मग तो म्हणाला की, तू तुझे सगळे कपडे काढून इनरवेअरमध्ये का बसत नाहीस ? मला बघायचंय की, तू तुझ्या शरीरासोबत किती कंफर्टेबल आहेस.नवीना बोले पुढे म्हणाली की, मी २००४ व २००६ बद्दल बोलत आहे. सुदैवानं कोणीतरी खाली माझी वाट पाहत होतं. पण ज्यावेळी साजिद मला असं म्हणाला, त्यावेळी मला काय उत्तर द्यावं, हे कळत नव्हतं आणि तेवढ्यात तो म्हणाला की तू स्टेजवर बिकिनी घालतेस, मग काय अडचण आहे ? त्याच्या भाषेत हे सर्व मूर्खपणाचं आहे. तुम्ही इथे येऊन आरामात बसू शकता, तुमच्या इच्छेनुसार राहू शकता. मला काय बोलावं, ते कळत नव्हतं आणि मी म्हणाले की, जर तुम्हाला हेच पहायचं असेल, तर मला घरी जाऊन बिकिनी घालावी लागेल आणि मी आत्ता माझे कपडे काढू शकत नाही. नवीना बोले म्हणाली की, कस तरी मी तिथून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. त्यानं मला कमीत कमी ५० वेळा फोन करून विचारलं असेल की, मी कुठे पोहोचले आणि मी का येत नाही ?