विस्तार अधिकाऱ्याने केला ग्रामसेविकेचा विनयभंग ; तो म्हणाला अशी कामे पैशाशिवाय होत नाहीत,तुमच्याकडून मी वेगळेच काहीतरी घेणार आहे….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | BORROWED NEWS | RAJA ATKORE NEWS | GRAMSEVAKE MOLESTATION NEWS | EXTENSION OFFICER FILED NEWS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – कर्जत पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी राजा आटकोरे यांनी महिला ग्रामसेविकेचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. अतिरिक्त ग्रामपंचायतीचा कार्यभार देत असतांना तो घेत नसल्याने यासाठी वेगळे काही तरी द्यावे लागते, असे म्हणत विनयभंग करण्याची घटना घडली आहे. या घटनेने महिला कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट पसरली असून याप्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(संग्रहित दृश्य.)
विस्तार अधिकारी राजा आटकोरे यांच्यावर गुन्हा दाखल.
याबाबत पिडित महिला कर्मचारी यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हंटले आहे कि २२ तारखेला पंचायत समिती कर्जत येथे मासिक सभा असल्याने सकाळी ११ वाजता ग्रामसेविका पंचायत समिती कार्यालयामध्ये आल्या होत्या. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास पीडित महिला कार्यालयामध्ये गेल्या होत्या. त्यावेळी विस्ताराधिकारी आटकोरे कार्यालयात एकटेच होते. यावेळी पीडित महिलेने मला आणखी एका ग्रामपंचायतचा अतिरिक्त कार्यभार देऊ नका अशी विनंती केली. यावर राजा आटकोरे यांनी अशी कामे पैशाशिवाय होत नाहीत. परंतू तुमच्याकडून मी वेगळेच काहीतरी घेणार आहे असे म्हणत विनयभंग केला असल्याची माहिती पिडीत महिलेने आपल्या पतीला सांगितली. यानंतर ग्रामसेविकेच्या पतीने विस्ताराधिकारी आटकोरे यांच्या चारित्र्याबद्दल चौकशी केली असता. त्यात आटकोरे अशाच पद्धतीने इतरही महिला कर्मचाऱ्यांशी असेच वर्तन करत असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विस्तार अधिकारी राजा आटकोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेत संबंधित विस्तार अधिकारी यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे. दरम्यान या घटनेने कर्जत पंचायत समितीमध्ये खळबळ उडाली असून सर्व महिला कर्मचारी संघटनांच्यावतीने या घटनेचा निषेध करण्यात आला आहे.