चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | SOLAPUR | BARSHI | CRIME NEWS | MINOR GIRL WAS MOLESTED BY ELDERS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
चॉकलेट आणि पैशाचे आमिष दाखवून दोन वृद्धांनी ११ वर्षांच्या शाळकरी मुलीचा विनयभंग केला असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात दोन्ही वृद्धांविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(संग्रहित दृश्य.)
वृद्धांविरोधात गुन्हा दाखल.
निळू बळीराम माने (वय ६०) आगतराव मुळे (वय ८०) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीचे आई-वडील रोजंदारीने काम करतात. २५ ऑगस्टला देखील ते रोजंदारीसाठी निघून गेले होते. तेव्हा पीडित मुलगी आणि तिचे भावंड घरी होते. दरम्यान पीडित परिसरात असलेल्या एका किराणा दुकानामध्ये खरेदीसाठी गेली असता आरोपीने तिचा हात पकडला. तुला चॉकलेट आणि खाऊ देतो असं म्हणत दोघांनीही पीडितेसोबत लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तावडीतून पीडितेने कशीबशी आपली सुटका केली. सायंकाळी आई-वडील कामावरून परत आल्यानंतर त्यांना मुलगी रडताना दिसली. तेव्हा विचारणा केली असता पीडितेने आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी तातडीने पोलिसांत धाव घेऊन यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.