बदलापूर घटनेवरील आरोपाला उत्तर ; अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MAHARASHTRA | BADLAPUR NEWS | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | SANJAY GAIKWAD | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील इतर भागातून अशाच प्रकराची प्रकरणं पुढे येत आहेत. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी द्या, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. राज्य सरकार कायदा सुव्यवस्था सांभाळण्यात अपयशी ठरलं असून आरोपींना कायद्याचा धाक राहिलेला नाही असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. बदलापूर प्रकरण आणि विरोधकांच्या आरोपांवर आता शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनीही भाष्य केलं आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असतात, मग आता काय मुख्यमंत्री राज्यातील शाळांमध्ये जाऊन पहारा देतील का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या विधानानंतर विविध राजकीय चर्चाही सुरू झाल्या आहेत. मुंबई तक या वृत्तावाहिनीला त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत ?
बदलापूरची घटना दुर्दैवी आहे. हा गुन्हा करणारी एक विकृती आहे. पण विरोधक या घटनेवरून राजकारण करत आहेत. विरोधातले सगळे पक्ष या मुद्द्यावरून थयथयाट करत आहेत. या घटनेला सरकारला जबाबदार धरत आहेत. पण आता काय मुख्यमंत्री राज्यातल्या सगळ्या शाळांमध्ये जाऊन पहारा देणार आहेत का ? की पोलीस अधिक्षक त्यांच्या घरी जाऊन बसणार आहेत ? आरोपी गुन्हा करण्यापूर्वी पोलिसांना फोन करून सांगतो का ? अशी प्रतिक्रिया संजय गायकवाड यांनी दिली आहे.
(संग्रहित दृश्य.)
राजकारण करण्यापेक्षा नराधमांना शिक्षा कशी मिळेल.
मुळात अशा प्रकाराच्या घटना घडत असतात मात्र त्या हाताळ्यासाठी एक व्यवस्था असते. राज्यात पोलीस यंत्रणा आहे. पोलिसांकडून असे प्रकरणं हाताळल्या जात नसेल तर ती सीबीआयकडे सोपवली जातात. पण आरोपीला सोडलं जात नाही. पण अशा घटनांचं राजकारण करण्यापेक्षा नराधमांना शिक्षा कशी मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. पण असे प्रयत्न होताना दिसत नाही. विरोधक कुठलीही घटना घडली की त्याचं राजकारण करतात असा आरोपही त्यांनी केला.
आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल.
काही दिवसांपूर्वीच बदलापूरच्या एका शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचा केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानंतर आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी बदलापूरमधील नागरिक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरले होते. दरम्यान या घटनेतील आरोपीला आता अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून आरोपीला कठोर शिक्षा दिली जाईल असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.