भिंगारमध्ये रणजीत सुतच्या दहशतीला आला सावकारकीचा उत.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | BHINGAR CAMP POLICE STATION | LENDER RANJIT SUT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
भिंगार शहरात सावकारकीला उत आला आहे. भिंगारमधील गवळीवाडा येथील रणजीत नामक इसम हा चक्क १० टक्क्यांनी पैसे वाटप करत आहे. रणजीत नामक इसम गोरगरिबांना ठराविक रक्कम देऊन त्या रकमेवर जोरजबरदस्तीने १० टक्के वाढीत रक्कम आकारात असल्याने भिंगारमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
गोरगरिबांच्या अडचणीचा फायदा घेऊन रणजीत मदतीच्या भावनेतून पुढे येतो. पीडितांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडे असलेल्या वस्तूंना आपल्याकडे गहान ठेवतो. ठराविक काळानंतर रणजीत ती वस्तू आता माझी झाली असून तुमचा त्या वस्तूवर कोणताही अधिकार नाही अशी तंबीच गोरगरिबांना देतो. गरजवंतांनच्या अडचणीचा फायदा घेऊन त्यांच्याकडून दारू पिण्यासाठी देखील हा पैसे घेत असल्याचे बोलले जाते. अनेक नागरिकांचे मोबाईल फोन तर काही महिलांचे दागिने देखील बळजबरीने रणजीतने ताब्यात घेतले आहे. रणजीतच्या दहशतीने भिंगारमधील काही नागरिकांनी भिंगार शहराला सोडचिठ्ठी दिली असल्याचे समजते.