TIMES OF AHMEDNAGAR
सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल करण्याला शरद पवार हेच जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. आत्ताच्या स्थिती इतकी घाणेरडी स्थिती कधीही झाली नव्हती. असे राज ठाकरे म्हणाले आहेत. नारायण राणे ज्यावेळी शिवसेनेतून फुटले त्यावेळी ते शरद पवार यांच्यासोबत जाणार होते. मात्र ऐनवेळी शरद पवारांनी हात वर केल्याचे राज ठाकरे म्हणाले. १९७८ ला शरद पवारांनी जर अशा राजकारणाची सुरुवात केली नसती तर हा उद्योग कोणालाच सुचला नसता, असे राज ठाकरे म्हणाले. नारायण राणे हे पहिले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते. पण बाहेर पडल्यावर शरद पवारांनी हात वर केले. त्यानंतर राणे काँग्रेसमध्ये गेल्याचे राज ठाकरे म्हणाले. हे सगळं शरद पवारांनीचं सांगितल्याचेही राज ठाकरे म्हणाले. शरद पवारांनी सुरु केलेल्या गोष्टीची पुढे सवय होत गेली. आज महाराष्ट्रातील परिस्थिती खूप लाजीरवाणी झाली आहे. कोण कुठेही जात आहे. ही निवडणूक मतदारांच्या मतांच्या अपमानाचा बदला घेण्याची असल्याचे राज ठाकरे म्हणाले.