तो जुमानत नाही पोलीसांचे ताकीद , कारण तो आहे कार्यकर्त्यांना गुटखा पुरविणारा आतीक. ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT POLICE, AHMEDNAGAR | GUTKHA TRADER ATIK | BHINGAR POLICE STATION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
देशभरात लोकसभा निवडणुकांचे वातावरण चांगलेच तापले आहे. काही ठिकाणाचे मतदान पूर्णपणे झाले असले तरीही काही ठिकाणी अजून मतदान होणे बाकी आहे. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात देखील लोकसभेच्या निवडणुकीने विखे आणि लंके या दिगज्जांना भिडवले होते.त्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात उलाढाल झाली. तर अनेक कार्यकर्त्यांचे शौक-पाणी देखील पूर्ण करण्यास काही नेत्यांनी हायगय केली नाही. या कार्यकर्त्यांचे लाड पुरविणाऱ्या आतीकने संपूर्ण शहर पिंजून काढले आहे. शहरात या गुटखा किंगचे साम्राज्य पसरले आहे. काही अल्पवयीन मुलांना टपरीवर फेऱ्या लावण्यासाठी देखील अतिककडून बळजबरी केली जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या अतिकाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस असक्षम असल्याचे एकंदरीत चित्र आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कार्यकर्त्यांचे बिल अन पदाधिकाऱ्यांना गुटका फुकट ?
लोकसभा निवडणुकीत कार्यकर्त्यांना त्रास होऊ नये म्हणून राजकीय यंत्रणेकडून जेवणाचे , राहण्याचे , ठेपे ठरवून देण्यात आले होते. रोज-रोज या आवश्यक वस्तूंचे बिल भरणे कठीण होत असल्याने हॉटेल आणि इतर ठिकाणच्या चालक मालकांशी थेट उधारीचे खाते या राजकीय लोकांकडून चालवण्यात आले होते. यामध्ये कार्यकर्त्यांना लागणारा गुटखा,हिरा,तंबाखू, विमल आणि इतर पानमसाला यासाठी देखील एका अवैध धंदे चालकाला तैनात करण्यात आले होते. अतिक नामक एका गुटखा व्यापारी अवैध कारभार चालवून या कार्यकर्त्यांच्या व्यसनाची सोय करत होता.त्या राजकीय नेत्यासोबत संबंध वाढवण्यासाठी अतिकने पदाधिकाऱ्यांना मोफत गुटखा देऊन खुश केले आहे. मात्र एका बड्या राजकीय नेत्याचा आशीर्वाद असल्याने अतिकाला पोलिसांचे देखील भय राहिले नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.