इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला; प्रशांत कोरटकर पसार, मोबाईल स्विच ऑफ Maharashtra Marathi News | Kolhapur police team to Nagpur in Indrajit ...(संग्रहित दृश्य.)

 कोरटकरांची, सावंतांना धमकी…

 इंद्रजीत सावंत यांनी छावा चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. ही भूमिका मांडत असताना त्यांनी ब्राह्मण समाजाचा द्वेष केल्याचा आरोप करून प्रशांत कोरटकर यांनी फोन करून थेट धमकी दिली. असा दावा सावंत यांनी केला आहे. याबाबत इंद्रजीत सावंत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग फेसबुकवर प्रसिद्ध केल त्यात जिथे असाल तिथे येऊन ब्राह्मणांची ताकद दाखवू. तुम्ही कितीही मराठे एकत्र करा, असे म्हणत या कोरटकर यांनी सावंतांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ आणि घरात येऊन मारण्याची दिली धमकी दिली आहे. यानंतर प्रशांत कोरटकर यांच्याविरूद्ध कोल्हापूर येथील जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे अटक टाळण्यासाठी कोरटकर यांनी सत्र न्यायालयात धाव घेऊन अटकपूर्व जामिनाची मागणी केली होती.