TIMES OF NAGAR 

विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्या एवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं आहे. तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं अशी चर्चा होताना दिसत आहे. यातच आज (दि.३) मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेल आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना (ठाकरे गट) विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे.  त्यातच आता विरोधी पक्षनेते पदावर आमचा हक्क आहे. असं विधान शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटल आहे. ते माध्यमांशी बोलत होते. आजपासून राज्यात विधिमंडळाचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू होत आहे. राज्याचे हिवाळी अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविना गेले. त्यामुळे या अधिवेशनात तरी विरोधी पक्षनेता हवा यासाठी महाविकास आघाडीकडून जोरदार हालचाली सुरू झालेल्या आहेत. याकरता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाबाबत आज संजय राऊतांना विचारलं असता ते म्हणाले. विरोधी पक्षनेतेपदावर आमचा हक्क आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विरोधीपक्षनेते पदाची मोठी परंपरा आहे. राज्यातील विरोधी पक्षांनी चोख कामगिरी पार पाडलेली आहे. तुम्ही निवडून आलेला आहात तुमचा विजय संशायस्पद असला तरीही विधानसभेत विरोधीपक्षनेता असल्याशिवाय लोकशाही विधिमंडळ पक्षला दिशा सापडणार नाही. मंत्र्यांची मनमानी चालू राहिल. भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना वेसण घालण्यासाठी विरोधी पक्षाची तरतूद करण्यात आलेली आहे. 

उद्धव ठाकरे मविआचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा", राऊतांच्या दाव्यावर राष्ट्रवादी अनुकूल? जयंत पाटील म्हणाले... | Sanjay Raut says Uddhav Thackeray can be CM Face of ...(संग्रहित दृश्य.)

आमच्याकडे ५० …..

विरोधी पक्षनेतेपदासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने शिवेसना (उद्धव ठाकरे) पक्षाला विरोधी पक्षनेतेपद कसं मिळेल यावर संजय राउत म्हणाले. (संख्याबळ) असा कोणताही नियम नाही. अनेक राज्यात चार-पाच सदस्य असलेल्या पक्षांनाही लोकशाहीची बाजू राखण्याकरता विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून ५० च्यावर आहेत. त्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता होण्यास अडचण वाटत नाही.