बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षाचे आमदार सुरेश धस यांनी हे प्रकरण चांगलेच उचलून धरले होते. या प्रकरणात आकाचा आका असा उल्लेख करत आमदार सुरेश धस यांनी वाल्मिक कराड सह राष्ट्रवादी (अजित पवार गटाचे) मंत्री धनंजय मुंडेंना देखील सळोकी पळो करून सोडले होते. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार सुरेश धस यांची वारंवार आरोपींना अटक करण्याची मागणी होती. सरपंच संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. अनेक ठिकाणी या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिला जामीन मंजूर झाला आहे. आरोपी सिद्धार्थ सोनवणेला केज कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. २५ हजारांच्या जाचमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. सिद्धार्थ सोनवणे विरोधात पुरावे नसल्याने सीआयडीने आरोपपत्र दाखल केले नाही. याच पार्श्वभूमीवर सीआयडीने आरोपपत्रातून सिद्धार्थ सोनवणेला वगळल्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.