पुण्यात बेदरकारपणे पोर्श ही अलिशान गाडी चालवून दोघांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांना पुणे सत्र न्यायालयाने २४ मेपर्यंतची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वकील असीम सरोदे यांनी यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. या प्रकरणाची सुनावणी संपल्यानंतर त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. तसंच, न्यायलयाने अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर ताशेरेही ओढले. १९ मे रोजी पहाटे अडीचच्या सुमारास पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात पोर्श या चारचाकी गाडीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया हे जोडपे जागीच मृत पावले. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अल्पवयीन मुलाच्या हाती गाडी दिल्यामुळे विशाल अग्रवाल यांना पोलिसांनी अटकही केली आहे. या प्रकरणी पुण्याच्या सत्र न्यायालयात आज सुनावणी पार पडली. विशाल अग्रवाल यांना आज कडोकोट बंदोबस्तात  सत्र पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. या सुनावणीत न्यायालयाने विशाल अग्रवाल यांना २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुानवली आहे.

Vishal Aggarwal: Latest News, Photos, Videos on Vishal Aggarwal - NDTV.COMस्त्रोत.सोशल मिडीया.

१८ वर्षे नसताना पबमध्ये पाठवणं चांगल्या पालकांचं लक्षण नाही.

याप्रकरणी माहिती देताना वकील असीम सरोदे म्हणाले या प्रकरणात वडील आरोपी आहेत. त्यांनी वडिलांची भूमिका व्यवस्थित पार पाडली नाही. गाडीवर नंबर नसताना, लायसन्स नसातनाही गाडी चालवायला दिली. १८ वर्षे नसताना पबमध्ये पाठवणं चांगल्या पालकांचं लक्षण नाही. बाल न्याय हक्कानुसार आपल्या पाल्याकडे दुर्लक्ष केलं आहे, हे त्याचंच लक्षण आहे की मुलावर नियंत्रण ठेवलं नाही. त्यामुळे कोर्टाने २४ तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली आहे. विशाल अग्रवालसह मालक नितेश शेवानी आणि व्यवस्थापक जयेश गावकरे यांनाही कोठडी सुनावण्यात आली आहे.

पुण्यातील अपघात प्रकरणातील विशाल अग्रवाल नक्की कोण आहेत?; संपत्ती किती आहे?  - Marathi News | Who is vishal agarwal father of pune porsche accident  accused vedant net worth all you need toस्त्रोत.सोशल मिडीया.

पालकांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही.

कोणी अपघात करेल आणि त्याला काहीच होणार नाही ही न्यायाची असमानता आहे. आम्ही कोर्टात सांगितलं की मुलाकडे परवाना नसतानाही त्याला गाडी चालवायला देणं हे पालक म्हणून अपयश आहे. त्यामुळे त्यांची चौकशी झाली पाहिजे. पालकांनी मुलाकडे लक्ष दिलं नाही. कायद्याचे एक-दोन मुद्दे आहेत. या प्रकरणात दोन एफआयआर असणेही बेकायदा आहे. आतापर्यंत चर्चा सुरू आहे. दारुबंदी कायद्याचं कलम लावलं नव्हतं असंही असीम सरोदे म्हणाले.

काशीपुर: कुंडा क्षेत्र से लापता किशोरी बरामद, आरोपी गिरफ्तार - Amrit Vicharस्त्रोत.सोशल मिडीया.

आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे.

वंदे मातरम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपीच्या तोंडावर शाईफेक करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवलं आणि आरोपी बचावला. दरम्यान, कार्यकर्ते शाईफेक करू शकले नसले तरी त्यांनी पोलिसांच्या वाहनासमोर उभे राहून जोरदार घोषणाबाजी केली. वंदे मातरम संघटनेचे कार्यकर्ते म्हणाले आरोपीला मोक्का या कायद्याअंतर्गत अटक केली पाहिजे. या बिल्डरवर या आधी अनेक गुन्हे दाखल आहेत आणि आता त्याच्या मुलाने हा किळसवाणा प्रकार केला आहे.