By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: देशमुखांचा खून आम्हीच केला ; वाल्मीक कराडच्या चेल्यांची कबुली तर कराडच्या आडचणी वाढणार…..
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > देशमुखांचा खून आम्हीच केला ; वाल्मीक कराडच्या चेल्यांची कबुली तर कराडच्या आडचणी वाढणार…..
क्राईम न्यूज

देशमुखांचा खून आम्हीच केला ; वाल्मीक कराडच्या चेल्यांची कबुली तर कराडच्या आडचणी वाढणार…..

Last updated: 2025/03/27 at 2:06 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR 

बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची बुधवारी (दि.२६ मार्च) सुनावणी पार पडली. परंतु या सुनावणीनंतर एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे वाल्मीक कराडचा पाय आणखी खोलात गेला आहे. कारण वाल्मीकच्या ३ चेल्यांकडून आम्हीच खून केल्याची कबुली देण्यात आली आहे. आरोपी सुदर्शन घुले, आरोपी जयराम चाटे आणि आरोपी महेश केदार यांनी पोलीस चौकशीदरम्यान आपल्या गुन्ह्याची कबुली दिली असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. त्यांच्या या कबुलीमुळे आता वाल्मीक कराड याच्या अडचणी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार वाल्मीक कराडच्या तीन चेल्यांची म्हणजेच आरोपी सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. या चौकशीतून तिघांनीही आपणच सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या सुदर्शन घुले याने पोलिसांना हत्येमागील कारण आणि घटनाक्रम सांगितल्याचेही सांगण्यात येत आहे. सुदर्शन घुलेने सुरुवातीला या हत्याप्रकरणात त्याचा सहभाग असल्याचे नाकारत होता. मात्र पोलिसांनी त्याला आवादा कंपनीच्या मॅनेजरकडून खंडणी मागतानाचा व्हिडीओ दाखवल्यानंतर त्याने पटापट या संदर्भातील माहिती दिली. सुदर्शन घुले याने होय आम्हीच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांचा खून केला अशी कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती समोर आली आहे.

Santosh Deshmukh brutal murder case main accused still at large after 15 days What happened to Valmik Karad windmill extortion case | Santosh Deshmukh Murder : संतोष देशमुख निर्घृण हत्या प्रकरणातील मुख्य(संग्रहीत दृश्य.)

वाल्मीक कराडच्या संकटात वाढ….

आवादा कंपनीच्या आवारात सरपंच संतोष देशमुख याने आम्हाला मारहाण केली होती. त्या दिवशी आमच्या मित्राचा वाढदिवस होता तेव्हाच संतोष देशमुखने आम्हाला मारले. यानंतर या मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करून संतोष देशमुख याने आम्हाला आव्हान दिले होते. याचा राग आमच्या मनात होता. तसेच आवादा कंपनीकडून खंडणी मिळण्यात संतोष देशमुख याचा अडथळा येत होता. त्यामुळे आम्ही २९ डिसेंबरला विष्णू चाटेच्या कार्यालयात एक बैठक घेतली. त्यानंतर नांदूर फाट्याजवळील तिरंगा हॉटेलमध्येही विष्णू चाटे याच्यासोबत बैठक केली. अशी कबुली सुदर्शन घुलेकडून देण्यात आली. तर आरोपी महेश केदार याने संतोष देशमुखांची हत्या करताना आपण व्हिडीओ शुट केल्याची कबुली पोलिसांना दिली. तर जयराम चाटे यानेही त्याच्याविरोधातील सर्व आरोप मान्य केले आहेत. तर हे आरोप आता आकाच्या तिन्ही चेल्यांकडून मान्य करण्यात आल्याने वाल्मीक कराडच्या संकटात वाढ झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला हा सरकारी वकील उज्ज्वल निकम लढवत असल्याने ते आरोपीं विरोधात जोरदार युक्तीवाद करत आहेत. निकम यांनी बुधवारी पहिल्यांदा युक्तिवाद केला. यावेळी उज्ज्वल निकम यांनी एक महत्त्वाचा पुरावा न्यायालयासमोर सादर केला. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर फरार असलेला आरोपी कृष्णा आंधळे याने वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांना तीन वेळा फोन केले होते. याचा सीडी आर रिपोर्ट उज्ज्वल निकम यांनी न्यायालयासमोर मांडला.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead1
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article ४ वर्षीय मुलाची गळा आवळून निर्घृण हत्या ; अपहरण व हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक….
Next Article पत्नीच्या हत्येप्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर अल्पवयीन बहिण, भाऊ आणि आईच्या डोक्यात दगडी पाट्याने हत्येचा प्रयत्न….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?