TIMES OF AHMEDNAGAR
मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चा विरुद्ध सदावर्ते यांनी कोर्टात धाव घेतली आहे. सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चावर कडक कारवाई करावी अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली. तर आज न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले की जर अर्ज असेल तर या पायी मोर्च्याला काहीच अडचण नाही. पण बेकायदेशीरपणे मुंबईकडे धडकणार असतील तर ताबडतोब आपला मोर्चा थांबवावा.
जरांगेंच्या मोर्च्याला सदावर्तेंचा विरोध.
मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला घेरले होते. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे सध्या लाखो कार्यकर्त्यासमवेत मुंबईकडे रवाना झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या विरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी पार पडली. या दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर अंतरवली सराटीत लाठीचार्ज दरम्यान २९ पोलीस जखमी झाले होते. त्याचा दाखला गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून हायकोर्टात देण्यात आला. यावेळी कोर्टाच्या वकिलांनी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.
जरांगे कायद्यापेक्षा मोठा नाही. – सदावर्ते