TIMES OF AHMEDNAGAR
लोकांना फुकट देण्यास सुरुवात केल्यास लोकांना आपण लाचार करत आहोत. तरुणांना पैसे दिल्यास तो काही काम करणार नाही, ड्रग्ज तसेच अन्य काही घेण्यास सुरुवात करेल. हाताला कामं देणं हे सरकारचं काम आहे. शेतकऱ्याने सुद्धा वीज फुकट मागितलेली नाही. वीजेमध्ये सातत्य द्या, नीट द्या, थोडी कमी भावात द्या, कोणीही फुकटं काही मागितलेलं नाही. फुकट पैसा महिना दोन महिना पुरेल. पण महाराष्ट्र दिवाळखोरीत निघून कंगाल होईल. राज्यावरील एक लाख कोटींवर कर्ज होईल. अगोदरची कर्ज फिटलेली नाहीत. अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फटकारले आहे.