TIEMS OF NAGAR
नागपूर : तुझं माझ्यावर पूर्वीसारखे प्रेम नाही. त्यामुळेच तू माझा नेहमी मानसिक व शारीरिक छळ करतोस. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. अशी सुसाईड नोट लिहून एका सैनिकाच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही दुर्दैवी घटना शनिवारी (दि.१५ ) मौद्यात घडली. प्रज्ञा मोहन सदांशिव (वय २५ रा. मौदा, एनटीपीसी वसाहत) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन सदांशिव हा मूळचा अचलपूर तालुक्यातील रहिवाशी असून तो केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (सीआयएसएफ) सैनिक आहे. त्याचे मामाची मुलगी प्रज्ञा हिच्यावर प्रेम होते. दोघांना लग्न करायचे होते. त्यांनी कुटुंबियांशी चर्चा करुन दोघांनी २०१९ मध्ये प्रेमविवाह केला. दोघेही आसामला राहत होते. तो गेल्या सहा महिन्यापूर्वी त्याची आता मौदा येथील नँशनल थर्मल पॉवर (एनटीपीसी) कंपनीत बदली झाली. तेव्हापासून दोघेही मौद्यात राहत होते. लग्नाला ६ वर्षे झाले तरी त्यांना मुलबाळ नव्हते. त्यामुळे मोहन नेहमी तणावात राहत होता. दारुच्या नशेत तो पत्नीला मारहाण करीत होता. तसेच तिचा मानसिक व शारीरिक छळ करीत होता. प्रज्ञा ही नेहमी आईवडिलांकडे तक्रार करायची. परंतु तिचे आईवडिल तिची समजूत घालायचे. गेल्या काही दिवसांपासून मोहन हा प्रज्ञाच्या चारित्र्यावर संशय घ्यायला लागला. तुझे कुणाशीतरी प्रेमसंबंध आहेत. असा आळ घेऊ लागला. ही बाब तिने आईला सांगितली. तिच्या कुटुंबियांनी मोहनची अनेकदा समजूत घालून वाद मिटवला. मात्र आठवड्याभरापासून मोहन दारु पिऊन पत्नीला मारहाण आणि शिवीगाळ करीत होता. चारित्र्यावर संशय घेऊन तिच्याशी भांडण करीत होता. त्यामुळे प्रज्ञा पतीच्या मानसिक व शारीरिक त्रासाला कंटाळली होती.
(संग्रहित दृश्य.)
पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या….
पतीला फोन केला. मी आता गळफास घेऊन आत्महत्या करीत आहे. कारण तू पूर्वीसारखा राहीला नाही. तू माझ्यावर प्रेम करीत नाही. असे म्हटले. त्यावर मोहनने तिला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मौदा पोलिसांनी या प्रकरणी पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मोहनवर दाखल केला. पत्नीच्या अंत्यसंस्कारानंतर पती मोहनला मौदा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला अटक करण्यात येणार आहे. अशी माहिती मौदा पोलिसांनी पतीच्या त्रासाला कंटाळून प्रज्ञाने आत्महत्या करण्याचा टोकाचा निर्णय घेतला. शनिवारी मोहन ड्युटीवर गेल्यानंतर तिने एक चिठ्ठी लिहिली. त्यात पती मोहनच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचा उल्लेख केला होता.