By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: तब्बल १० वर्षाने मोठ्या असलेल्या विधवा महिलेवर तरुणाचे प्रेम… अनैतिक संबंधातून विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृण खून.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > तब्बल १० वर्षाने मोठ्या असलेल्या विधवा महिलेवर तरुणाचे प्रेम… अनैतिक संबंधातून विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृण खून.
क्राईम न्यूज

तब्बल १० वर्षाने मोठ्या असलेल्या विधवा महिलेवर तरुणाचे प्रेम… अनैतिक संबंधातून विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृण खून.

Last updated: 2025/03/22 at 2:05 PM
By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR

भंडारा : तब्बल १० वर्षाने मोठ्या असलेल्या गावातीलच एका विधवा महिलेवर त्याचे प्रेम जडले आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. मात्र एके दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी तरुणाने विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला. ही धक्कादायक घटना लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोगरा शिवणी या गावात दि. २१ मार्च रोजी घडली. पुष्पा रामेश्र्वर बनकर (वय ३७) असे मृत महिलेचे नाव असून खुशाल पुरुषोत्तम पडोळे (वय २७ वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. मृतक व आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. मृतक पुष्पा बनकर ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करीत होती. काही वर्षापूर्वी तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने तिला शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले आणि नंतर आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला. मृतक पुष्पा व आरोपीचे मागील अडीच वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मोगरा येथील नाल्याजवळ मृतक महिलेचे शेत असून शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. घटनेच्या दिवशी मृतक महिला ही शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेली होती. थोड्या वेळाने आरोपी तिथे गेला. यादरम्यान दोघात वाद झाला. या वादातून आरोपीने मृतकाच्या शेतालागत असलेल्या सागवनाच्या वाडीत दोरीने गळा आवळून विधवेचा निर्घृणपणे खून केला. यानंतर आरोपीने लाखनी पोलीस ठाणे गाठले व हत्येची कबुली दिली. लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हान,पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव व लाखनी पोलिस ठाण्याची घटनास्थळी दाखल झाली होती.  

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry1
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पंतप्रधान मोदींच्या मे २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ३८ परदेश दौऱ्यांवर जवळपास २५८ कोटींचा खर्च.
Next Article दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?