क्राईम न्यूज तब्बल १० वर्षाने मोठ्या असलेल्या विधवा महिलेवर तरुणाचे प्रेम… अनैतिक संबंधातून विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृण खून. Last updated: 2025/03/22 at 2:05 PM By BHAIYYASAHEB BOXER 2 Min Read Share SHARE TIMES OF NAGAR भंडारा : तब्बल १० वर्षाने मोठ्या असलेल्या गावातीलच एका विधवा महिलेवर त्याचे प्रेम जडले आणि दोघांमध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. मात्र एके दिवशी दोघांमध्ये वाद झाला आणि आरोपी तरुणाने विधवा महिलेचा नॉयलॉन दोरीने गळा आवळून निर्घृणपणे खून केला. ही धक्कादायक घटना लाखनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोगरा शिवणी या गावात दि. २१ मार्च रोजी घडली. पुष्पा रामेश्र्वर बनकर (वय ३७) असे मृत महिलेचे नाव असून खुशाल पुरुषोत्तम पडोळे (वय २७ वर्षे) असे आरोपी तरुणाचे नाव आहे. मृतक व आरोपी एकाच गावातील रहिवासी आहेत. मृतक पुष्पा बनकर ही भाजीपाल्याचा व्यवसाय करून आपल्या दोन मुलांचा सांभाळ करीत होती. काही वर्षापूर्वी तिच्या पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. दरम्यान शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास आरोपी खुशाल पडोळे याने तिला शेतशिवारातील नाल्याकडे बोलावले आणि नंतर आरोपीने दोरीने गळा आवळून तिचा निर्घृण खून केला. मृतक पुष्पा व आरोपीचे मागील अडीच वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याची माहिती समोर येत आहे. मोगरा येथील नाल्याजवळ मृतक महिलेचे शेत असून शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. घटनेच्या दिवशी मृतक महिला ही शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेली होती. थोड्या वेळाने आरोपी तिथे गेला. यादरम्यान दोघात वाद झाला. या वादातून आरोपीने मृतकाच्या शेतालागत असलेल्या सागवनाच्या वाडीत दोरीने गळा आवळून विधवेचा निर्घृणपणे खून केला. यानंतर आरोपीने लाखनी पोलीस ठाणे गाठले व हत्येची कबुली दिली. लगेच पोलीस घटनस्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे पाठविले. घटनेचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद चव्हान,पोलिस निरीक्षक हृदयनारायण यादव व लाखनी पोलिस ठाण्याची घटनास्थळी दाखल झाली होती. You Might Also Like चारित्र्यावर संशय घेत नवऱ्याने झोपेत असलेल्या बायकोच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार ; जीवे मारण्याचा प्रयत्न… वडिलांकडे सोडतो सांगत १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार… तर व्हिडीओ काडून घरच्यांना जिवे मारण्याची धमकी. झिपलाईन करायला गेली अन् तिथेच जीव गमावला, पुण्याच्या तरुणीचा ३० फूट उंचीवरून कोसळून मृत्यू… तुमच्या घरावर वाईट नजर आहे. प्रेतात्मा वाईट करण्यासाठी टपले आहेत. अंधश्रद्धेच्या नावे दोन वर्षात तब्बल ३३ लाखाचा गंडा… नवरीची सर्वांसमोर प्रियकराला मिठी, प्रेम प्रकरण उघडकीस, नवरीच्या त्रासाला कंटाळून इन्कम टॅक्स अधिकारी असलेल्या नवरदेवाने आयुष्य संपवलं Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print By BHAIYYASAHEB BOXER Follow: EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA. Previous Article पंतप्रधान मोदींच्या मे २०२२ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत झालेल्या ३८ परदेश दौऱ्यांवर जवळपास २५८ कोटींचा खर्च. Next Article दंगलखोरांची प्रॉपर्टी विकून नुकसान भरपाई वसूल करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Leave a comment Leave a Reply Cancel replyYour email address will not be published. Required fields are marked *Comment * Name * Email * Website Save my name, email, and website in this browser for the next time I comment.