महायुती मनपा निवडणूक एकत्र लढणार मुंबईत एकत्र आहोतच जिथे शक्य तिथे एकत्र मुंबईत हे पक्के असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसे प्रमुख राज ठाकरे यांना महायुतीतसोबत घेणार का ? असा सवालही विचारण्यात आला. यावर राज ठाकरेंच्या संबंधात आज तरी निर्णय झालेला नाही. त्यांचा निर्णय ते घेत असतात. त्या त्यावेळी विचार केला जाईल असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत पुन्हा युती होऊ शकते का ? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर नाही…असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी थेट उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीसांच्या या उत्तरानंतर उपस्थितांनी टाळ्या देखील वाजल्या.